घरमुंबईयुतीमुळे भाजपाचे एक पाऊल मागे

युतीमुळे भाजपाचे एक पाऊल मागे

Subscribe

मुंबई महापालिकेच्या विविध खात्याचा सहायक अभियंत्यांना कार्यकारी अभियंता पदी बढती देण्याचा प्रस्ताव महापालिका सभागृहाच्या पटलावर मंजूर करण्यात आला आहे.

शिवसेना आणि भाजपाची युती होताच महापालिकेत पहारेकरीची भूमिका वठवणाऱ्या भाजपाला सेनेपुढे नमते घ्यावे लागले. अभियंत्यांच्या पदोन्नतीच्या विषयावर भाजपने शासनाचे परिपत्रक डावलून हा निर्णय प्रशासनाने घेतल्याचा आरोप करत फेरविचारासाठी प्रस्ताव परत पाठवण्याची मागणी उपसूचनेद्वारे केली होती. परंतु ही उपसूचना मंजुरीला टाकताच भाजपच्या एकाही नगरसेवकाने अनुकूलच्या बाजूने मतदानात भाग घेतला नाही. उलट शांत राहत प्रस्ताव मंजुर करण्यास सेनेला साथ दिली. त्यामुळे भाजपाचे नगरसेवक गुरगुरत असले तरी युतीमुळे त्यांना आता सेनेला शिंगावर घेता येत नाही.

ठराविक अभियंत्यांसाठीच हा प्रस्ताव

मुंबई महापालिकेच्या विविध खात्याचा सहायक अभियंत्यांना कार्यकारी अभियंता पदी बढती देण्याचा प्रस्ताव महापालिका सभागृहाच्या पटलावर मंजुरीला आला होता. या प्रस्तावात काही शिक्षा झालेल्या अभियंत्यांना पदोन्नती देण्यात येत असल्याने विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी याचा विरोध करत हा प्रस्ताव फेरविचारासाठी परत पाठवण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती. रवी राजा सभागृहात नसल्याने महापौरांनी अशाप्रकारचे पत्र प्राप्त झाल्याची माहिती सभागृहाला दिली. परंतु यावर भाजपाचे सुनील यादव यांनीही विरोध दर्शवत शासनाच्या १९९६ आणि १७ डिसेंबर २०१७च्या परिपत्रकाचा भंग होत असल्याचे स्पष्ट केले. कोणत्याही कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी प्रलंबित असेल किंवा त्याला शिक्षा झाली असेल तर त्यांना पदोन्नती देता येत नाही, असे या परिपत्रकात म्हटल्याचे त्यांनी सांगितले. काही ठराविक अभियंत्यांसाठीच हा प्रस्ताव बनवला आहे. त्यामुळे जर यांना लाभ मिळणार असेल तर सर्वानाच याचा लाभ मिळायला हवा असे सांगितले.

- Advertisement -

प्रस्ताव संमत होणे गरजेचे

याला भाजपाचे प्रभाकर शिंदे यांनी शासनाच्या परिपत्रकाचा भंग करत आणलेला हा प्रस्ताव फेरविचारासाठी प्रशासनाकडे परत पाठवण्यात यावा अशी उपसूचनेद्वारे मागणी केली. यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी यातील काही अभियंते दोन चार महिन्यांनी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे प्रस्ताव परत पाठवल्यास त्यांचे नुकसान होईल, त्याकरता हा प्रस्ताव संमत होणे आवश्यक आहे, असे सांगितले. भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी याबाबत प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी सूचना केली. तसेच विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी हा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवण्याची लेखी स्वरूपात निवेदन केले आहे. त्यामुळे त्यांच्या मागणीचा विचार व्हावा, पण त्यांच्या अनुपस्थित प्रस्ताव मंजूर करू नये, अशी सूचना केली.

युतीमुळे सौम्य भूमिका घेत माघार

यावर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आपले मत उपसूचना मतास टाकली. पण उपसूचनेच्या बाजूने मतदान न झाल्याने ही मागणी फेटाळली गेली आणि मुळ प्रस्ताव मंजुर करण्यात आला. जो प्रस्ताव फेरविचारासाठी परत पाठवण्यासाठी भाजपाने परिपत्रकाचा आधार घेतला. विरोध नव्हे तर उपसूचना मांडली. पण त्या भूमिकेवर भाजपाचे नगरसेवक ठाम नसल्याने केवळ युती धर्म म्हणून सौम्य भूमिका घेत माघार घ्यावी लागली.

- Advertisement -

हेही वाचा- ऐतिहासिक! युतीचा विश्वास संपादनासाठी स्नेहभोजन

हेही वाचा- युती झाल्याने परस्परांविरोधी तक्रारी मागे घ्या


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -