घरमुंबईशिवसेना शाखेसमोर भाजप उमेदवारचे बॅनर वादाच्या भोवऱ्यात

शिवसेना शाखेसमोर भाजप उमेदवारचे बॅनर वादाच्या भोवऱ्यात

Subscribe

अंबरनाथ पश्चिम येथील सुभाषवाडी परिसरात फातिमा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी फुटओव्हर ब्रिजसाठी मदतनिधी जमा केला आहे. मात्र, तरी देखील शाळा प्रशासनाने फूटओव्हर ब्रिजचे काम केले नसल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

उल्हासनगर येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाळेसमोर भाजप उमेदवाराचे बॅनर लावले होते. यात भाजप उमेदवाराला शिवसेनेचे समर्थन असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, ज्या नगरसेवकांचे या बॅनरवर फोटो लावण्यात आले होते त्यांनीच आक्षेप घेतल्याने शेवटी त्यांचे फोटो झाकण्यात आले आहेत. कल्याण (पूर्व) विधानसभा मतदारसंघात शिवसेना – भाजप – रिपाई युतीतर्फे भाजपचे गणपत गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात कल्याण आणि उल्हासनगर महानगरपालिकेतील प्रभाग येत असून उल्हासनगरचे शिवसेना नगरसेवक धनंजय बोडारे यांनी बंडखोरी करून ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. शिवसेनेच्या २६ नगरसेवकांनी धनंजय बोडारे यांना पाठिंबा दिलेला आहे. मात्र, आता शिवसेनेचे समर्थन मागण्यासाठी भाजपचे वरीष्ठ नेते दबावतंत्राचा वापर करीत आहेत.

या दबावतंत्राचा एक भाग म्हणून उल्हासनगर – ४ मधील मराठा सेक्शन परिसरातील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेसमोर गणपत गायकवाड यांचे बॅनर लावले होते. त्यात उल्हासनगर मधील नगरसेवकांचे समर्थन असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला गेला . मात्र, काही वेळानंतर या बॅनरमुळे मोठा वाद निर्माण झाला आणि शिवसेना नगरसेवकांचे फोटो झाकावे लागले. हे बॅनर फाडले गेले असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.

- Advertisement -

आमचे समर्थन अपक्ष उमेदवार धनंजय बोडारे यांना आहे. भाजप उमेदवार गणपत गायकवाड यांना आमचा विरोध आहे. बोडारे यांना समर्थन देताना उल्हासनगरचे १० आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या १६ अशा एकूण २६ शिवसेना नगरसेवकांनी पक्षाकडे राजीनामे दिले आहेत. आम्ही शाखेसमोर युतीचा उमेदवार म्हणून भाजपचे गणपत गायकवाड यांच्या बॅनरला परवानगी दिली होती. मात्र, आमचे त्यांना समर्थन नसताना आमचे फोटो का लावले याबाबत आमचा आक्षेप आहे.  – शेखर यादव; शिवसेना नगरसेवक उल्हासनगर मनपा

नेमका काय प्रकार झाला याची मला माहिती नाही. मी अंबरनाथमध्ये डॉ. बालाजी किणीकर यांच्या प्रचारात व्यस्त असल्याने मला या घटनेची कल्पना नाही.  – राजेंद्र चौधरी; शिवसेना शहरप्रमुख उल्हासनगर

- Advertisement -

हेही वाचा – डोंबिवली स्मार्ट लोकांची बकाल सिटी – राज ठाकरे


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -