घरमुंबईअकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड; १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड; १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश

Subscribe

अकरावी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची आज शिक्षण उपसंचालक कार्यालयात अक्षरश: झुंबड उडाली होती.

अकरावी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी मंगळवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयात झुंबड उडाली. प्रवेश प्रक्रियेत प्रवेश न मिळालेले, काही कारणास्तव प्रवेश घेता न आलेले विद्यार्थी, एटीकेटी असलेले विद्यार्थी, फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी यावेळी गर्दी केली होती. प्रवेशाची खात्री नसल्याने जवळपास शेकडो विद्यार्थ्यांचे वर्ष फुकट जाण्याच्या शक्यता असताना शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या विशेष फेरी राबवण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला.

या कारणांमुळे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित होते

अर्ज भरताना झालेल्या तांत्रिक चुका, घरात निर्माण झालेल्या समस्या, आजारी असल्याने प्रवेश घेता आला नाही, अर्ज भरलाच नाही, एटीकेटी, फेरपरीक्षेनंतर पसंतीच्या कॉलेज मिळाले नाही, अशा विविध कारणांनी अनेक विद्यार्थी अकरावी प्रवेशापासून वंचित होते. प्रवेशापासून वंचित विद्यार्थी शिक्षण उपसंचालक कार्यालयात फेर्‍या मारत असल्याने कार्यालयाने १५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान विशेष फेरी राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी सकाळी ९ वाजल्यापासून शिक्षण उपसंचालकांच्या चर्नीरोड येथील कार्यालयात विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. प्रवेशासाठी झालेल्या गर्दीमुळे १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना कार्यालयाकडून टोकन देण्यात आले. तसेच दुपारनंतर आलेल्या विद्यार्थ्यांना बुधवारी येण्यास सांगण्यात आले आहे. प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थ्यांपैकी जवळपास ५० विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जही भरले नव्हते. तर अनेक विद्यार्थ्यांना विविध कारणामुळे प्रवेश घेता आला नव्हता. त्यामुळे ज्यांनी अर्ज भरला नव्हता, अशा विद्यार्थ्यांना प्रवेशपुस्तिका देऊन त्यांचे अर्ज भरून त्यांना आणि प्रक्रियेदरम्यान प्रवेश घेता न आलेल्या विद्यार्थ्यांचे कागदपत्रे तपासून त्यांना ऑनलाईन पद्धतीने कार्यालयाकडून जागीच प्रवेश देण्यात आले.

- Advertisement -

शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या निर्णयामुळे वर्ष वाया जाणार नसले तरी पसंतीचे कॉलेज मिळणार नसल्याची खंत अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थी प्रवेश रद्द करण्यासाठीही आले होते. परंतु प्रवेश रद्द करता येणार नसल्याचे अधिकार्‍यांकडून त्यांना सांगण्यात आले.

घरामध्ये निर्माण झालेल्या समस्येमुळे प्रवेश परीक्षेदरम्यान आम्ही गावाला गेलो होतो. त्यामुळे मला प्रवेश घेता आला नव्हता. मागच्याच आठवड्यात आम्ही मुंबईत परत आलो.  – रिद्धी भोसले; विद्यार्थी

- Advertisement -

पेपर पुनर्तपासणीसाठी मी अर्ज केला होता. परंतु त्याचा निकाल वेळेवर लागला नाही. त्यामुळे मला प्रवेश घेता आला नाही.  – प्रथमेश पवार; विद्यार्थी

९० हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त

मुंबई विभागात जवळपास ३.१० लाख जागा होत्या. त्यासाठी तीन नियमित, एक विशेष आणि तीन प्रथम प्राधान्य फेरी अशा सात फेर्‍यातून जवळपास २.१८ लाख विद्यार्थ्यांना आतापर्यंत प्रवेश मिळाले आहेत. त्यामुळे ९० हजारापेक्षा जास्त जागा शिल्लक राहिल्या आहेत.

प्रवेशापासून वंचित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर प्रवेश देण्याचे आमचे प्रयत्न आहेत. मोठ्या प्रमाणात रिक्त जागा असल्याने सर्वांना प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरण्याचे कारण नाही.  – राजेंद्र अहिरे, उपसंचालक, मुंबइ विभाग


हेही वाचा – आजपासून दहावी परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरूवात


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -