घरताज्या घडामोडीविधिमंडळ परिसरात भाजप - कॉंग्रेस आमने

विधिमंडळ परिसरात भाजप – कॉंग्रेस आमने

Subscribe

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या २०२१ च्या सुरूवातीलाच विधिमंडळ परिसरात कॉंग्रेस – भाजप आमने सामने आल्याचे पहायला मिळाले. कॉंग्रेसने केंद्र सरकारविरोधात सायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर कॉंग्रेसने केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर भाजपनेही विधान भवन परिसरात सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली. भाजकडूनही सत्ताधारी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी दोन्ही पक्षाचे आमदार विधान भवन परिसरात एकमेकांसमोर घोषणाबाजी देताना दिसते. त्यामध्ये कॉंग्रेसकडून भाई जगताप तर भाजपकडून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड हे एकमेकांविरोधात घोषणाबाजी करताना दिसते. भाजपकडून ठाकरे सरकार हाय हाय अशी घोषणाबाजी करण्यात आली. विधानभवन परिसरात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतरही भाजपकडून घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. (Congress agitation ahead of Maharashtra Assembly Budget Session 2021)

विधानभवनापर्यंत कॉंग्रेसने काढली सायकर रॅली

- Advertisement -

केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करत कॉंग्रेसकडून सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीसाठी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यासारख्या नेत्यांसह कॉंग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पहायला मिळाली. केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेसकडून जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. केंद्रातल्या मोदी सरकराने ज्या प्रकारे महागाई वाढवण्याचा विक्रम केला आहे. याचा देशभरातून काँग्रेस विरोध करत आहे. या देशाच्या लोकांच्या ताटातलं अन्न हिसकण्याचे काम केंद्राने सुरु केले आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -