पोहरादेवीची ‘पूजा’ तरी कशी पावेल….भाजपचा राठोडांना टोला

तब्बल १५ दिवस अज्ञातवासात गेलेले राठोड आज सर्वांसमोर आले. त्यावरून भाजपचे नेते केशव उपाध्ये यांनी राठोड यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

bjp spokeperson keshav upadhye slams congress over ram mandir fund
राममंदिर निधीची काँग्रेसने उठाठेव करू नये; केशव उपाध्ये यांचा टोला

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत आलेले शिवसेनेचे नेते व वनमंत्री संजय राठोड यांनी आज सपत्नीक पोहरादेवीचे दर्शन घेतले. तब्बल १५ दिवस अज्ञातवासात गेलेले राठोड आज सर्वांसमोर आले. त्यावरून भाजपचे नेते केशव उपाध्ये यांनी राठोड यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

राठोड यांच्या पोहरादेवी पूजेवरून उपाध्ये यांनी एक टि्वट केले. त्यात त्यांनी पोहरादेवीची पूजा तरी कशी पावेल जर चव्हाणाच्या पूजाच काय झालं ते सांगितल नाहीत तर ? असे म्हटले आहे. तसेच दुसऱ्या टि्वटमध्ये त्यांनी राठोड यांच्याबरोबरचं मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला आहे.

यात युवतीच्या मृत्यूप्रकरणात नाव असलेले मंत्री १५ दिवस गायब होतात. मुख्यमंत्री गप्प. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला हरताळ फासत हे मंत्री सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत शक्ती प्रदर्शन करतात. सत्तेची अपरिहार्यता असू शकेल, मुख्यमंत्री किमान कोरोनाचे नियम मोडल्याचा गुन्हा दाखल करेल का असा सवालही उपाध्ये यांनी या टि्वटमध्ये केला आहे.