घरताज्या घडामोडीToolkit Case: पटियाला हाऊस कोर्टाकडून दिशा रवीला मोठा दिलासा

Toolkit Case: पटियाला हाऊस कोर्टाकडून दिशा रवीला मोठा दिलासा

Subscribe

टूलकिट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पर्यावरणवादी दिशा रवीला पटियाला हाउस कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दिशाला एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे. आज पोलीस कस्टडीचा कालावधी संपल्यानंतर दिशा पुन्हा एकदा पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी ४ दिवसांची पोलीस कस्टडीची मागणी केली होती. दरम्यान यापूर्वी काल (सोमवारी) पटियाला हाऊस कोर्टाने दिशा रवीला आणखीन एका दिवसासाठी पोलीस कस्टडीमध्ये पाठवण्याचे आदेश दिले होते. त्यावेळेस दिल्ली पोलिसांना ५ दिवसांच्या पोलीस कस्टडीची मागणी केली होती. पण आज अखेर दिशा रवीला मोठा दिलासा मिळाला असून तिचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

टूलकिट प्रकरणी आरोपी दिशा रवीला पटियाला हाऊस कोर्टमध्ये सोमवारी दाखल केले होते. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने कोर्टाला सांगितले की, ‘याप्रकरणी शंतनू आणि निकिता जॅकब दोन आरोपी आहेत. शंतनूला तिथल्या कोर्टाने १० दिवसांची ट्रांजिट बेल दिली आहे. तर निकिता जॅकबला हायकोर्टने ट्रांजिट बेल मिळाली आहे. दिशा रवीने तिच्यावर लावले सर्व आरोप शंतनू आणि निकितावर लावले आहेत. त्यामुळे आता दिल्ली पोलिसांकडे सर्व आरोपींना एकमेकांसमोर बसवून चौकशी करण्याशिवाय पर्याय नाही आहे.’

- Advertisement -

टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलीसच्या स्पेशल सेलने बेंगळुरूतून २१ वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला १२ फेब्रुवारीला अटक केले होते. २१ वर्षी ही पर्यावरणवादी कार्यकर्ता फ्रायडे फॉर फ्यूचर कॅम्पेनच्या फाउंडरोंमधील एक आहे. ४ फेब्रुवारीला दिल्ली पोलिसांनी टूलकिटसंदर्भात तक्रार दाखल केली होती.

कोण आहे दिशा रवी?

दिशा रवी पर्यावरणवादी असून ती जलवायूबाबत जनजागृती करते. दिशा मूळची बेंगळुरूची असून ती बेंगळुरूच्या प्रतिष्ठित माऊंट कार्मेलची विद्यार्थीनी आहे. दिशाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट केलेल्या ग्रेटा थनबर्गला पाठिंबा दर्शवला होता. ग्रेटाच्या ट्विटमध्ये आंदोलन कसे करावे, याबाबतची माहिती देणारे टुलकिट शेअर केले होते. यालाच दिशाने देखील पाठिंबा दर्शवला. त्यामुळे दिशाविरोधात देशविरोधी कटकारस्थान रचल्याचा आरोप करण्यात आला. पण दिशाने फक्त शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी असे केले असल्याचे सांगितले. पण तरी दिल्ली पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Farmer Protest: दिल्लीत आज आंदोलक शेतकऱ्यांकडून ‘पगडी संभाल दिवस’ आंदोलन


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -