घरठाणेमंदिर तोडणार्‍याला तोडून टाका ! भाजप आमदाराचे चिथावणीखोर भाषण

मंदिर तोडणार्‍याला तोडून टाका ! भाजप आमदाराचे चिथावणीखोर भाषण

Subscribe

मोहने येथील गावदेवी मंदिराचे बांधकाम तोडल्याप्रकरणी कल्याण तालुक्यातील कोळी, आगरी समाज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विरोधात एकवटला आहे. पालिकेच्या धोरणाविरोधात सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आंदोलनाचे हत्यार उपसण्याचे धोरण जाहीर केल्याने अखेर शुक्रवारी आयुक्तांसोबत शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

गुरुवारी झालेल्या एका कार्यक्रमात भाजपचे आमदार रमेश पाटील यांनी ग्रामदेवतेच्या मंदिरावर पालिकेच्या अधिकार्‍याने केलेल्या कारवाईचा समाचार घेत चिथावणीखोर भाषण केले होते. आमदार पाटील यांनी आापल्या भाषणात सांगितले की, ज्या अधिकार्‍याने विनापरवाना गावदेवतेचे मंदिर तोडले आहे, त्याला आता तोडण्याची वेळ आली असून दोन दिवसात त्या अधिकार्‍यावर कारवाई न झाल्यास कल्याण बंद करण्याचा इशारा दिला.

- Advertisement -

तसेच आमचे मंदिर परत बांधून द्या आणि त्या अधिकार्‍याला तुरुंगात टाका, असे वादग्रस्त विधान केले आहे. हिंदूंची मंदिरे जर तोडली जाणार असतील तर आम्ही ते सहन करणार नसल्याचे सांगून कल्याण तालुक्यातील कोळी आगरी बांधवांनी आंदोलनासाठी सज्ज राहण्याचे आमदार रमेश पाटील यांनी सांगितले.

पालिका प्रशासन नरमले
ग्रामदेवतेच्या जुन्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे बांधकाम सुरू असल्याप्रकरणी प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांनी कुठलाही मुलाहिजा न बाळगता बांधकाम तोडले. महापालिका क्षेत्रातील सर्वच आगरी कोळी समाजांनी एकत्र येऊन पालिकेवर प्रचंड दबावतंत्राचा वापर करीत वातावरण सतत पेटते ठेवले. पालिका आयुक्तांना भेटीस गेलेल्या शिष्टमंडळास चार-पाच दिवसात मंदिराचे कामकाज सुरू करावे असे सांगण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त असून यामुळे पालिका प्रशासनाला अखेर नमावे लागल्याची चर्चा होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -