घरमुंबईमुंबईच्या किनाऱ्यावर विषारी 'ब्लू बॉटल' जेली फिश

मुंबईच्या किनाऱ्यावर विषारी ‘ब्लू बॉटल’ जेली फिश

Subscribe

काही ठराविक ऋतूत जेली फिश पाण्याबाहेर येत असतात. पावसाळ्यात ब्लू बॉटल समुद्रकिनारी येतात. समुद्रात वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे ते किनाऱ्यालगत येतात.

मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर वाळूत चालण्याचा मोह आवरत नसेल तर थांबा. कारण मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर विषारी ‘ब्लू बॉटल’ जातीचे जेली फिश आढळून आले आहेत. प्लास्टिकच्या बॉटलप्रमाणे दिसणारे हे जेलीफिश चटकन ओळखता येत नाही. त्याच्यावर पाय पडला तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. सागरी परिसंस्थेच्या अभ्यासकांच्या निदर्शनातून ही माहिती समोर आली आहे.

कुठे सापडले ‘ब्लू बॉटल’ जेली फिश

गेल्या काही वर्षांपासून मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर जेली फिश आढळून आले आहेत. जेली फिश म्हटल्यावर आपल्याला छान छत्रीच्या आकाराचा आणि पाण्यात मुक्त विहार करणारा असा जीव आठवतो. अनेकदा कार्टून मध्येही तुम्ही हा समुद्रीजीव पाहिला असेल. पण हा जीव जितका छान दिसतो तितकाच त्रासदायक आहे. मुंबईच्या जुहू आणि गिरगाव भागात ब्लू बॉटल नावाचे विषारी ब्लू बॉटल जेली फिश आढळले आहेत. त्यामुळे या दोन किनाऱ्यांवर अनवाणी पायाने जाऊ नका, अशा सूचना ‘सेंट्रल मरिन फिशरीज रिसर्च इन्स्टिटयूटने दिल्या आहेत.

- Advertisement -

कसे ओळखाल ‘ब्लू बॉटल’ जेली फिश

काही ठराविक ऋतूत जेली फिश पाण्याबाहेर येत असतात. पावसाळ्यात ब्लू बॉटल समुद्रकिनारी येतात. समुद्रात वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे ते किनाऱ्यालगत येतात. हे जेलीफिश २ इंच आकाराचे असून त्याचे शरीर निळ्या रंगाचे आणि फुग्यासारखे असते. आणि त्यांना लांब दोरीसारखे पाय असतात.

‘ब्लू बॉटल’चावल्यावर काय कराल?

ब्लू बॉटल जेलीफिश चावल्यावर शरीर दुखू लागले. डंख केलेला भाग लाल होते. तुम्हाला हा जेलीफिश चावल्यास घाबरुन न जाता जेथे जेलीफिशने डंख मारला आहे तो भाग स्वच्छ धुवून घ्या. जेलीफिशने चावल्यानंतर तुमच्या शरीरात बारीक बारीक काटे असल्यासारखे वाटतील ते काढा. जखमेवर गरम पाण्यात तो अवयव ठेवा. शक्य असल्यास गरम पाण्याच्या शॉवर खालीच जास्तीजास्त वेळ राहा. गरम पाण्याची सोय शक्य नसेल तर बर्फ चोळा. दुखणे कमी होईल. सूज आणि दुखणे कमी झाले नाही तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -