घरमुंबईBMC : मेट्रोच्‍या कंत्राटदारांकडे 375 कोटींचा मालमत्ता कर थकीत; महापालिकेने बजावली नोटीस

BMC : मेट्रोच्‍या कंत्राटदारांकडे 375 कोटींचा मालमत्ता कर थकीत; महापालिकेने बजावली नोटीस

Subscribe

मुंबई : मुंबई महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने, कोट्यवधी रुपयांच्या कर थकबाकीदार कंत्राटदार, बिल्डर, उद्योजक, सोसायटी, कंपन्या आदींना कर भरणा करण्यासाठी नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. विशेषतः मुंबईचा चेहरामोहरा बदलणाऱ्या मेट्रो रेल्वेचे जाळे मुंबईभर पसरले असून मेट्रोची कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडेही पालिकेची तब्बल 375 कोटी रुपयाची मालमत्ता थकबाकी असल्याचे समोर आले आहे. (BMC 375 crore property tax due to Metro contractors Notice issued by the Municipal Corporation)

हेही वाचा – Jitendra Awhad : मविआच्या बैठकीनंतर आव्हाड म्हणाले, आघाडी म्हटलं की मतभेद असतात; पण…

- Advertisement -

मेट्रो रेल्वेची कोट्यवधी रुपयांची कंत्राट कामे चालविणाऱ्या एचसीसी – एम.एम.सी. कंत्राटदाराकडे 98 कोटी 92 लाख 41 हजार रुपये, सी.ई.सी. – आय.टी.डी. 95 कोटी 60 लाख 7 हजार रुपये, डोगा सोमा – 94 कोटी 39 लाख 81 हजार रुपये, एल ऍण्ड टी स्टेक – 82 कोटी 12 लाख 84 हजार रुपये, एचसीसी – एम.एम.सी. – 4 कोटी 7 लाख 63 हजार रुपये अशी एकूण 375 कोटी 12 लाख 78 हजार रुपयांची मालमत्ता करापोटी थकबाकी प्रलंबित आहे. या कंत्राटदारांनी अद्यापही ही कोट्यवधी रुपयांची थकबाकी भरलेली नसल्याने महापालिकेने या सर्व कंत्राटदारांना
कर भरण्याबाबत 19 मार्च रोजी नोटिसा बजावल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आल्या आहेत. तसेच, संबंधित कंत्राटदारांनी मालमत्‍ता कर वेळेत भरावा, यासाठी करनिर्धारण व संकलन विभागाच्या वतीने पाठपुरावा सुरू आहे.

मुंबई महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाच्यावतीने वर्ष 2023-24 या आर्थिक वर्षाचे उद्दिष्टाइतके मालमत्ता कर संकलित करण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. करनिर्धारण व संकलन विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहेत. 28 मार्च रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत पालिकेने 2 हजार 398 कोटींची कर वसुली केली आहे. सध्या करनिर्धारण व संकलन विभागाने मुंबई शहर आणि उपनगरांमधील मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच मागील थकबाकी वसुलीसाठीबाबतही प्राधान्य देण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : महाराष्ट्रातील 48 जागांवर आतापर्यंत कोणत्या पक्षाकडून कोणाला संधी? वाचा यादी

मुंबईत विविध ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत. कास्‍टींग यार्ड भूखंडाचा मालमत्‍ताकर भरण्‍याची करारनाम्‍यानुसार जबाबदारी संबंधित कंत्राटदारांवर आहे. तथापि, कंत्राटदारांकडून विलंब होत असल्‍याची बाब उघड झाली आहे. अखेरीस, मेसर्स एचसीसी – एमएमसी, मेसर्स सीईसी – आयटीडी, मेसर्स डोगा सोमा आणि मेसर्स एल ऍण्ड टी स्‍टेक या कंत्राटदारांना मालमत्‍ताकर भरण्‍याबाबत नोटिसा बजाविण्‍यात आल्या आहेत.

‘टॉप टेन’ मालमत्ताधारकांची यादी

  1. मेसर्स एचसीसी – एमएमसी (एफ उत्तर विभाग) – 98 कोटी 92 लाख 41 हजार 241 रुपये
  2. मेसर्स सीईसी – आयटीडी (एफ उत्तर विभाग) – 95 कोटी 60 लाख 7 हजार 443 रुपये
  3. मेसर्स डोगा सोमा (एफ उत्तर विभाग) – 94 कोटी 39 लाख 81 हजार 421 रूपये
  4. मेसर्स एल अॅण्‍ड टी स्‍टेक (एफ उत्‍तर विभाग) – 82 कोटी 12 लाख 84 हजार 714 रुपये
  5. निर्मल लाईफस्‍टाईल (टी विभाग) – 40 कोटी 65 लाख 83 हजार 785 रुपये
  6. विधी रिअॅलिएटर्स (पी उत्‍तर विभाग) – 16 कोटी 95 लाख 8 हजार 919 रूपये
  7. जे कुमार इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर प्रा. लि. (पी उत्‍तर विभाग) – 16 कोटी 30 लाख 25 हजार 432 रुपये
  8. रॉयल रिअॅलिएटर्स (पी उत्‍तर विभाग) – 4 कोटी 44 लाख 48 हजार 120 रुपये
  9. मेसर्स एचसीसी – एमएमसी (एफ उत्‍तर विभाग) – 4 कोटी 7 लाख 63 हजार 419 रुपये
  10. राधा कन्‍स्‍ट्रक्‍शन (पी उत्‍तर विभाग) – 2 कोटी 90 लाख 74 हजार 387 रुपये
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -