घरमुंबईElection Duty : नायर रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांची नेमणूक रद्द करण्याची आयुक्तांकडे मागणी

Election Duty : नायर रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांची नेमणूक रद्द करण्याची आयुक्तांकडे मागणी

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणूक 2024 च्या कामकाजासाठी पालिका प्रशासनाने नायर रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिका यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णालयातील वैद्यकीय सेवेवर विपरित परिणाम होणार आहे, रुग्णांचे हाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नायर रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका यांची केलेली नेमणूक रद्द करण्याबाबत फेरविचार करण्यात यावा, अशी मागणी दि म्युनिसिपल युनियनच्यावतीने उपाध्यक्ष रंगनाथ सातवसे आणि कामगार नेते रमाकांत बने यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. (Election Duty Request to commissioner to cancel appointment of doctors nurses in Nair hospital)

हेही वाचा – Ramdas Athawale : महाविकास आघाडीनंतर महायुतीतही बिघाडी; रामदास आठवलेंनी दिला इशारा

- Advertisement -

एप्रिल व मे 2024 मध्ये लोकसभा निवडणूक घेत असल्याचे निवडणूक आयोग यांनी जाहीर केले आहे. या निवडणूकीच्या कामासाठी महापालिकेच्या इतर खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणात नेमणूक करण्यात आली आहे. त्यातच आता पालिकेच्या नायर रुग्णालयातील 148 परिचारिका व वैद्यकीय अधिकारी संवर्गातील कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी 1 व 6 एप्रिल 2024 रोजी त्यांचे निवडणूक कामकाज विषयक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून त्यानंतर त्यांची नेमणूक निवडणूक कामकाजावर करण्यात येणार आहे.

नायर रुग्णालय येथील तत्कालीन अधिष्ठाता यांनी दि म्युनिसिपल युनियन यांना पाठविलेल्या पत्रानुसार इंडियन मेडिकल कौन्सिलच्या नॉर्म्सप्रमाणे रुग्णालयात 1,454 इतक्या परिचारिकांची आवश्यकता असताना केवळ 688 इतकी मंजूर पदे आहेत. प्रत्यक्षात 634 इतक्या परिचारिका रुग्णालयाच्या पटावर कार्यरत आहेत. या अपुऱ्या संख्येने असलेल्या परिचारिका रुग्णालयातील कामाचा असह्य ताण सहन करून रुग्णालयात दाखल रुग्णाची सेवा बजावत असताना, त्यातील 148 परिचारिका व वैद्यकीय अधिकाऱ्यांची निवडणूक कार्यासाठी नेमणूक करण्यात आलेली आहे. या अशा निर्णयामुळे नायर रुग्णालयातील वैद्यकीय व्यवस्था कोलमडून पडेल आणि प्रचंड आणीबाणीची व गोंधळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचे कामगार नेते रंगनाथ सातवसे आणि कामगार नेते रमाकांत बने यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Ramdas Athawale : महाविकास आघाडीनंतर महायुतीतही बिघाडी; रामदास आठवलेंनी दिला इशारा

तसेच, निवडणूक आयोग यांनी निवडणूकीच्या अनुषंगाने 7 जून 2023 रोजी एक आदेश पारित केला असून, सदर आदेशातील 10 व्या परिच्छेदामध्ये निवडणूककामी वगळण्याच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची यादी देण्यात आलेली आहे. त्यामध्ये 10 (1) (ii) नुसार वैद्यकीय कर्मचारी अधिकारी यांना निवडणूक कामातून वगळण्यात आलेले असून तसे परिपत्रक अस्तित्वात आहे, अशी बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणण्यात आली आहे. त्यामुळे, नायर रुग्णालय व इतर रुग्णालयातील परिचारिका व वैद्यकीय अधिकारी यांना लोकसभा निवडणूक कामासाठी करण्यात आलेली नेमणूक त्वरित रद्द करण्याबाबत विचार करुन त्यांना सदर कर्तव्यातून वगळण्यात यावे व तसा आदेश तातडीने पारित करावा, अशी मागणी युनियनचे रंगनाथ सातवसे व कामगार नेते रमाकांत बने यांनी आयुक्त गगराणी यांच्याकडे लिखित पत्राद्वारे केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -