घरमुंबईमहापालिकेच्या रुग्णालयातील रुग्णवाहिकांचे खासगीकरण!

महापालिकेच्या रुग्णालयातील रुग्णवाहिकांचे खासगीकरण!

Subscribe

विरोधी पक्षांसहित भाजपाचे प्रत्यक्षात १२ सदस्य असताना, प्रत्यक्षात मतदानाच्या वेळी ११ सदस्यांनीच मतदान केले. तर शिवसेनेचे ११ सदस्य असल्याने मतांची बरोबरी झाली. मात्र, त्यानंतर भाजपा पुरस्कृत अभासेच्या गीता गवळी तिथे पोहोचल्या. पण मतदान समसमान झाल्याने अध्यक्षांनी आपले मतदान मंजुरीच्या बाजूने टाकले आणि भाजपासहित विरोधकांची मागणी फेटाळून लावली.

महापालिकेच्या ८ रुग्णालयांसाठी २३ साध्या तसेच कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स भाडेतत्वावर घेत रुग्णवाहिका सेवेचे खासगीकरण करण्याचा निर्णय स्थायी समितीने बुधवारी घेतला. भाजपासहित काँग्रेस आणि सपा तसेच राष्ट्वादी काँग्रेसच्या सदस्यांचा विरोध असतानाही शिवसेनेने नाट्यमयरित्या प्रस्ताव मंजूर केला. प्रस्ताव मंजूर करण्यास शिवसेनेला भाजपासमर्थक गीता गवळी यांची मदत झाली. गवळी बाहेर गेल्याची संधी साधत बरोबरीत झालेल्या सदस्य संख्येत अध्यक्षांनी आपले मत मंजुरीच्या बाजूने देत रुग्णवाहिका भाडेतत्वावर घेण्याचा मार्ग मोकळा केला.

पहारेकऱ्यांनी केला होता विरोध

रुग्णांच्या सुविधांसाठी ६ रुग्णालयात भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या रुग्णवाहिकांचे कंत्राट सप्टेंबर २०१८ ला संपुष्टात आले. त्यामुळे पुढील दोन वर्षांकरता महापालिकेच्या ८ रुग्णालयांसाठी एकूण २३ रुग्णवाहिन्या दोन वर्षांकरता भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ९.९५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. विरोधी पक्षांसह पहारेकर्‍यांनी याला तीव्र विरोध करत प्रस्ताव फेरविचारासाठी परत पाठवला होता. परंतु पुन्हा तोच प्रस्ताव प्रशासनाने पटलावर आणला होता. याला भाजपाचे प्रभाकर शिंदे यांनी विरोध करत प्रस्ताव रेकॉर्ड करण्याची मागणी उपसूचनेद्वारे केली. प्रस्ताव आणण्याचे अधिकार नसणार्‍या अधिकार्‍यांनीच हा प्रस्ताव आणत स्थायी समितीची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला.

- Advertisement -

रुग्णवाहिका कर्मचारी देशोधडीला?

विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी याला पाठिंबा देत हा मोठा भ्रष्टाचार असल्याचे सांगितले. आज कोणत्याही नामांकित संस्था महापालिकेला रुग्णवाहिका देऊ शकतात. यासाठी काही संस्थाही पुढे येत आहे. पण भाडेतत्वावरील रुग्णवाहिका घेण्यासाठी अशा संस्थांची मदत घेतली जात नसल्याचा आरोप राजा यांनी केला. मुंबईत १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांचा वापर होत नसल्याने त्या ग्रामीण भागात पाठवण्यात आल्याचे सांगत भाजपाचे अभिजित सामंत यांनी रुग्णवाहिका महापालिका रुग्णालयात ठेवायला हव्या होत्या. त्यामुळे हे आरोग्य विभागाचे अपयश असल्याचा आरोप केला. राष्ट्वादी काँग्रेसच्या राखी जाधव यांनी रुणवाहिका भाड्याने घेत एक प्रकारे रुग्णवाहिकांवरील कर्मचार्‍यांना देशोधडीला लावण्याचे काम केले जात असल्याचा आरोप केला. तर सपाचे रईस शेख यांनीही पूर्वी दिलेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी करत हा प्रस्ताव रेकॉर्ड करावा, अशी मागणी केली.


हेही वाचा – मुंबई महानगर पालिका कर्मचाऱ्यांना १५,००० रुपयांचा बोनस!

ऐन वेळी कँटिनमध्ये जाणं भोवलं?

विरोधी पक्षांसहित भाजपाचे प्रत्यक्षात १२ सदस्य असताना, प्रत्यक्षात मतदानाच्या वेळी ११ सदस्यांनीच मतदान केले. तर शिवसेनेचे ११ सदस्य असल्याने मतांची बरोबरी झाली. मात्र, त्यानंतर भाजपा पुरस्कृत अभासेच्या गीता गवळी तिथे पोहोचल्या. पण मतदान समसमान झाल्याने अध्यक्षांनी आपले मतदान मंजुरीच्या बाजूने टाकले आणि भाजपासहित विरोधकांची मागणी फेटाळून लावली. मतदानापूर्वीच गीता गवळी कँटीनमध्ये निघून गेल्या होत्या. गवळी यांच्या एका मतामुळेच प्रस्ताव मंजूर झाला. गवळींच्या एका मतामुळे भाजपा आणि विरोधकांची मतसंख्या १२ एवढी होणार होती. त्यामुळे सरससरळ हा प्रस्ताव फेटाळला जाणार होता, त्यामुळेच अध्यक्षांनी गीता गवळी कँटीनमध्ये गेल्याची संधी साधून मतदान घडवून आणले आपला करिष्मा घडवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -