घरमुंबईओशिवरा स्मशानभूमी विद्युत दाहिनीचे अर्धवट काम कंत्राटदाराला भोवले

ओशिवरा स्मशानभूमी विद्युत दाहिनीचे अर्धवट काम कंत्राटदाराला भोवले

Subscribe

ओशिवरा हिंदू स्मशानभूमीच्या विद्युत दाहिनेचे काम अर्धवट सोडल्याने पालिकेने कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले आहे.

जोगेश्वरी पश्चिम येथील ओशिवरा हिंदू स्मशानभूमीच्या विद्युत दाहिनीचे रुपांतर पीएनजीवर करण्याचे काम अर्धवट सोडणार्‍या मेसर्स जे. अॅण्ड जे. हॉटमॅक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला महापालिकेने काळ्या यादीत टाकले आहे. त्यामुळे आता या विद्युत दाहिनीच्या अर्धवट कामांसाठी नव्याने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येत आहे.

मुंबईतील महापालिकेच्या स्मशानभूमीतील विद्युत दाहिनींचे पाईप्ड नॅचरल गॅस आधारित ग्रीन स्मशानभूमीत रुपांतर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार जोगेश्वरी पश्चिम येथील ओशिवरा हिंदू स्मशानभूमीत अस्तित्वात असलेल्या विद्युतदाहिनी क्रमांक २चे पाईप्ड नॅचरल गॅसवर अर्थात पीएनजीवर रुपांतर करण्यासाठी महापालिकेने स्थायी समितीच्या मान्यतेने मार्च २०१६मध्ये मेसर्स जे. अॅण्ड जे. हॉटमॅक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड केली होती. त्यानुसार या कंपनीने कामाला सुरुवात केली. परंतू हे काम पुढे अर्धवट सोडून दिले. त्यानंतर या कंपनीला वारंवार स्मरणपत्र देवूनही त्यांनी काम पुढे चालू ठेवण्यास नकार दिल्यामुळे या कंपनीला महापालिकेने काळ्या यादीत टाकले.

- Advertisement -

दुसऱ्या कंत्राटदाराची निवड

या स्मशानभूमीत राखीव शवदाहिनींची सोय नसल्याने सध्या वापरात असलेल्या विद्युत शवदाहिनी क्रमांक १वर जास्त ताण येत आहे. त्यामुळे हे अर्धवट काम पुढे पूर्ण करण्यासाठी निविदा मागवण्यात आली आहे. त्यामुळे १ कोटी १४ लाख रुपयांचे कंत्राट मेसर्स अडोर वेल्डींग लिमिटेड कंपनीला देण्यात आले आहे. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर पुढील ९ महिन्यांमध्ये हे काम पूर्ण केले जाईल, असे महापालिकेच्या यांत्रिकी व विद्युत विभागाने स्पष्ट केले.

हेही वाचा – मालाड दुर्घटनाग्रस्तांना खासगी कंपन्यांकडून मोफत आरोग्य चाचण्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -