घरमुंबईमालाड दुर्घटनाग्रस्तांना खासगी कंपन्यांकडून मोफत आरोग्य चाचण्या

मालाड दुर्घटनाग्रस्तांना खासगी कंपन्यांकडून मोफत आरोग्य चाचण्या

Subscribe

मालाडमध्ये सोमवारी मध्यरात्री भिंत कोसळून अनेक जण जखमी झाले. अशा दुर्घटनाग्रस्त रूग्णांच्या मोफत आरोग्य चाचण्या करण्यासाठी खासगी कंपन्या आणि खासगी हॉस्पिटल्स पुढे सरसावले आहेत.

मालाडमध्ये सोमवारी मध्यरात्री भिंत कोसळून अनेक जण जखमी झाले. अशा दुर्घटनाग्रस्त रूग्णांच्या मोफत आरोग्य चाचण्या करण्यासाठी खासगी कंपन्या आणि खासगी हॉस्पिटल्स पुढे सरसावले आहेत. टेक्निकल मॅनपॉवर आऊटसोर्सिंग कंपनी, आरवी एनकॉन आणि सैफी हॉस्पिटल यांच्या वतीने ही मदत करण्यात येणार आहे. या सेवांसाठी कंपनींकडून दरवर्षी ६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून ३ वर्षांसाठी हा करार करण्यात आला आहे.

आरवी एनकॉनच्या वतीने सीबीसी, ईएसआर, कोलेस्टेरॉल, ईसीजी आणि छातीचा एक्सरे इ. सुविधा पुरवल्या जाणार आहेत.

- Advertisement -

काही कारणांमुळे गरजू लोकांना आणीबाणीच्या वेळेतही मूलभूत आरोग्य सेवा मिळत नाही. या एका उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे. यातून गरजूंना फायदा होईल.‌
– व्ही. डी. संघवी, व्यवस्थापकीय संचालक, आरवी एनकॉन लिमिटेड

या उपकमातून आरवी एनकॉन सैफी हॉस्पिटलच्या ओपीडीमध्ये येणाऱ्या रूग्णांच्या वैद्यकीय चाचण्यांसाठी आणि उपचारांसाठी पैसे पुरवण्यात येणार आहे. जे रूग्ण दुर्घटनाग्रस्त असतील त्यांच्या चाचण्या तपासण्या करण्यात येणार आहेत. तसेच ज्यांना औषधांचा खर्च परवडत नसेल अशांसाठी ही सुविधा असल्याचे सांगण्यात आलं आहे. तर, आरवी एनकॉन कंपनी कडून चर्चगेट, मरीन लाइन्स, चर्नीरोड आणि ग्रॅटरोड यासारख्या स्थानकांवर अपघात झाल्यास या उपक्रमांतर्गत एकूण १२ वैद्यकीय चाचण्या मोफत तर औषधे देखील रुग्णांना सैफी हॉस्पिटलकडून सवलतीच्या दरात पुरवली जाणार आहेत.

- Advertisement -

काय आहे घटना 

मालाडमधील पिंपरीपाडा परिसरात सोमवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास संरक्षक भिंत झोपड्यांवर कोसळल्यामुळे २८ जण मृत्यूमुखी तर ४० हून अधिक जण जखमी झाले होते. मृतांच्या कुटुंबियांना सरकारतर्फे पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली होती. 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -