घरमुंबईमुंबई महापालिकेत ३३ हजार ४४१.०२ कोटींचा अर्थसंकल्प सादर

मुंबई महापालिकेत ३३ हजार ४४१.०२ कोटींचा अर्थसंकल्प सादर

Subscribe

मुंबई महापालिकेचा २०२०-२१ चा अर्थसंकल्प यंदा पहिल्यांदाच पेनड्राईव्हच्या माध्यमातून सादर करण्यात आला. मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंग परदेशी यांनी महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना महापालिकेचा मुख्य अर्थसंकल्प सादर केला.

मुंबई महापालिकेचा २०२०-२१ चा अर्थसंकल्प यंदा पहिल्यांदाच पेनड्राईव्हच्या माध्यमातून सादर करण्यात आला. मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंग परदेशी यांनी महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना महापालिकेचा मुख्य अर्थसंकल्प सादर केला. एकूण ३३ हजार ४४१.०२ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. तर, ६.५२ कोटी शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. २०१९-२० पेक्षा ९% वाढ करण्यात आली आहे.

महापालिका अर्थसंकल्प –

रस्ते – गोरेगाव -मुलूंड लिंक रोड साठी ३०० कोटींची तरतूद , या प्रकल्पात ३ पटीने वाढ

- Advertisement -

रस्ते टिकाऊपणा – मागिल अर्थसंकल्पापेक्षा या अर्थसंकल्पात ४ पटीने रक्कम वाढ केली आहे. रस्ते सुधारणा कामांसाठी १६०० कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.

पूल – पूलांसाठी ७९९.६५ कोटींची तरतूद , ४७ मोठ्या पूलांची दुरूस्ती व १८४ किरकोळ पूल दुरूस्त करणार

- Advertisement -

बेस्ट – २०१९-२० मध्ये बेस्ट साठी कमी केलेल्या दरामुळे १० % पेक्षा जास्त प्रवासी वाढ झाली आहे. २०१९ -२० मध्ये १९४१.३१ कोटींचे अनुदान बेस्ट उपक्रमातील सध्याच्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी दिले होते या वर्षीसाठी १५०० कोटींची तरतूद.

आपत्कालीन विभाग – या विभागासाठी ५ कोटींची तरतूद

आरोग्य विभाग – आरोग्य खात्यासाठी ४२६० कोटींची तरतूद , यावर्षी अर्थसंकल्पात १४ % नी वाढ करण्यात आली आहे. कोरोना व्हायरस चा धोका मुंबईला होऊ शकतो म्हणून २ कोटींची तरतूद महापालिकेचे कस्तुरबा रूग्णालयाला देणार बळकटी. आरोग्य खात्याच्या महसुली व भांडवली खर्चासाठी 4260. 34 कोटी इतकी तरतूद करण्यात आली असून, 2019 20 च्या सुधारित अंदाजाच्या तुलनेत 14 टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे

नैसर्गिक आणि पुरातत्व – वीरमाता जीजाबाई भोसले उद्यान साठी २ कोटी रू तरतूद, चौपाट्या आणि समुद्र किनाऱ्यांची सुधारणा व माहीम , वांद्रे , सायन आणि वरळी किल्यांच्या पुनर्स्थापनेची कामे हातात घेणार

पुरातत्व आणि नैसर्गिक साठी १८३.३० कोटींची तरतूद

आपत्ती मुक्त मुंबई पुरसदृश परिस्थिती कमी करणे आणि पर्जन्य जलवाहिनी मध्ये सुधारणा यसाठी ५ कोटींची तरतूद

पाणी पुरवठा – पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी गारगाई प्रकल्प विकसित करण्यासाठी तरतूद – ५०३.५१ कोटी

हरित मुंबई – मुंबईत झाडांची संख्या वाढवण्यासाठी मियावकी वनीकरण पद्धतीने दाट शहरी वनीकरण करण्याचा प्रस्ताव, मियावकी पद्धतीने 4 लाख झालं लावणार

मागील वर्षात २५ हजार वृक्ष तोडण्याच्या परवानगी मिळाल्या होत्या चालू वर्षात ३ हजार २३६ वृक्ष तोडण्याची परवानगी

उद्यान खात्यासाठी २२६.७७ कोटी तरतूद

आगीच्या धोक्यापासून मुक्त मुंबई – कमला मिल येथील आगीच्या दुर्घटनेनंतर सत्यशोधक समितीच्या शिफारशीनुसार, महापालिकेच्या २४ विभागामध्ये स्वतंत्र अग्निसुरक्षा पालन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. परिणामकारक हा प्रतिबंधक कारवाई नियमांचे सक्त अनुपालन आणि इमारतीचे वेळोवेळी निरीक्षण यामुळे आधीच्या घटनांमध्ये २०१८ साली ५२ असलेली संख्या २०१९ मध्ये २४ झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -