घरमुंबईगोवंडीमध्ये कचऱ्याच्या गाडीने चिमुरड्याला चिरडले

गोवंडीमध्ये कचऱ्याच्या गाडीने चिमुरड्याला चिरडले

Subscribe

मुंबईच्या गोवंडीमध्ये भरधाव वेगात असलेल्या कचऱ्याच्या गाडीने तीन वर्षाच्या मुलाला चिरडल्याची घटना घडली. अपघातामध्ये चिमुकल्याचा मृत्यू झाला असून घटनास्थळावर तणावाचे वातावरण आहे.

मुंबईध्ये भरधाव वेगात असलेल्या कचऱ्याच्या गाडीने चिमुरड्याला चिरडले. गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात ही घटना घडली आहे. तीन वर्षाच्या मोहम्मद गौस दस्थगिर अहमद याला कचऱ्याच्या गाडीने चिरडले. दरम्यान या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अशी घडली घटना

गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात दुपारी ही घटना घडली. शिवाजीनगर परिसरातील प्लॉट क्रमांक २८ आणि प्लॉट क्रमांक २९ मध्ये असणारा रस्ता क्रमांक ४ वर ही दुर्देवी घटना घडली. ३ वर्षाच्या मोहम्मद आपल्या बहिणीसोबत घराबाहेर पडलेला. मात्र भरधाव वेगात आलेल्या कचऱ्याच्या गाडीने त्याला चिरडले. घटनास्थळावर स्थानिकांनी धाव घेत मोहम्मदला उपचारासाठी राजावाडी रुग्णालय घेऊन गेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

- Advertisement -

संतप्त जमावांकडून गाडीची तोडफोड

देवनार येथे कचरा डेपो असल्याने या परिसरातून नेहमी कचऱ्याच्या गाड्यांची ये-जा होत असते. अपघाताच्या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण होते. संतप्त झालेल्या जमावांनी कचऱ्याच्या गाडीची तोडफोड केली. दरम्यान घटनास्थळावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मोहम्मद घरच्यांचा होता लाडका

अपघातात मृत्यू झालेल्या मोहम्मदला पाच बहिणी आहेत. पाच बहिणींनंतर मोहम्मद झाल्यामुळे घरामध्ये तो सर्वांचा लाडका होता. त्याचे वडील दुबईला नोकरी करतात. या घटनेनंतर मोहम्मदच्या कुटुंबियांसह परिसरात शोककळा पसरली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -