घरमुंबईBMC Election 2022 Strategy : युवासेनेच्या २२७ शाखा अधिकाऱ्यांची सेना भवनात खलबतं

BMC Election 2022 Strategy : युवासेनेच्या २२७ शाखा अधिकाऱ्यांची सेना भवनात खलबतं

Subscribe

इतर पक्षातून युवासेनेत पदाधिकारी आणण्याकडे सर्वांचा कल असून आतापर्यंत काँग्रेस, भाजप आणि मनसेचे वरिष्ठ युवा कार्यकर्ते युवासेनेत आले आहेत.

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यासाठी युवासेनेने कंबर कसली आहे. युवासेना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणनीती तयार करण्यासाठी बैठका घेत असून बुधवारी युवासेनेच्या २२७ शाखा अधिकाऱ्यांची शिवसेना भवनमध्ये बैठक पार पडली. २०१८ नंतर युवासनेची शिवसेना भवनमध्ये पहिली बैठक पार पडली. या बैठकीला युवासेना सचिव वरुण सरदेसाई, शिवसेनेचे सचिव आणि युवासेना कोअर कमिटी सदस्य सुरज चव्हाण, युवासेनेचे सरचिटणीस अमोल किर्तीकर, नगरसेवक आणि युवासेनेचे खजिनदार अमेय घोले, युवासेना कोअर कमिटी सदस्य सिद्धेश कदम, अंकित प्रभु, पवन जाधव, साईनाथ दुर्गे हे सर्व या बैठकीला उपस्थित होते.

युवासेनेची ही बैठक तब्बल दोन तास सेना भवनात सुरु होती. युवासेनेच्या पालिका निवडणुकांच्या दृष्टीने विभागवार बैठका सुरु आहेत. याच दरम्यान, शिवसेना भवनात युवासेनेची २०१८ नंतर बैठक पार पडली. २२७ वॉर्डमध्ये जसे शिवसेनेचे शाखा प्रमुख असतात; तसेच युवासेनेचे शाखा अधिकारी असतात. या २२७ शाखा अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत वरुण सरदेसाई, साईनाथ दुर्गे, सुरज चव्हाण आदींनी उपस्थित शाखा अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.

- Advertisement -

आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील सर्व युवासेना विस्तारक, उपसचिव, सह सचिव यांची बैठक युवासेना कार्यकरिणी सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सगळीकडे शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा असं कार्यकरिणी सदस्यांनी मार्गदर्शन करत पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं.

यामध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने काय काम केलं पाहिजे यावर चर्चा झाली. तरुणांना युवासेना प्रमुख मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ठाकरे सरकार काय काम करत आहेत त्याची माहिती युवकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोवायची यावर चर्चा झाली. तसंच, युवासेना काय काम करते, लोकांच्या हिताच्या दृष्टीने कशापद्धतीन युवासेनेचं काम सुरु आहे, याची माहिती तरुण-तरुणींपर्यंत कशा पद्धतीनं पोहोचवली पाहिजे; तसंच युवासेनेच्या माध्यमातून तरुणांना पक्षात कसं आणता येईल यावर बुधवारी झालेल्या बैठकीत चर्चा झाली. इतर पक्षातून युवासेनेत पदाधिकारी आणण्याकडे सर्वांचा कल असून आतापर्यंत काँग्रेस, भाजप आणि मनसेचे वरिष्ठ युवा कार्यकर्ते युवासेनेत आले आहेत.

- Advertisement -

मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून पक्षात इनकमिंगही वाढलं आहे. यात युवासेना मोठ्या प्रमाणात हातभार लावत आहे. युवासेना सध्या इतर पक्षातून कार्यकर्त्यांना शिवसेनेत आणण्याचा प्रयत्न करत असून त्यात ते यशस्वी देखील होत आहेत. मागील महिन्यात भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विशाल केचे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याशिवाय, जुलैमध्ये मनसेला धक्का देत मनसेचे विद्यार्थी सेना अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांना शिवसेनेत आणलं. याशिवाय, अमरातवती जिल्ह्यातील प्रभावी युवा नेते युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सागर देशमुख यांनी देखील ऑक्टोबरमध्ये शिवसेनेत प्रवेश केला.


हेही वाचा – मुंबई महापालिकेतील प्रभागांची संख्या वाढवण्याच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -