घरलाईफस्टाईलIron deficiency : महिलांनो 'ही' लक्षणं दिसल्यास सावध व्हा! शरीरात असू शकते...

Iron deficiency : महिलांनो ‘ही’ लक्षणं दिसल्यास सावध व्हा! शरीरात असू शकते लोहाची कमी

Subscribe

आपल्या शरीरात सतत काही ना काही बदल होत असतात. अनेकदा आपण या बदलांकडे दुर्लक्ष करतो. विशेषत: महिला कामाच्या घाईगडबडीत छोट्याछोट्या लक्षणांकडेही दुर्लक्ष करतात. यामुळे अनेक परिणाम भविष्यात भोगावे लागतात. अशात अनेकदा शरारीत लोहाचे प्रमाण कमी होते. लोह हे हिमोग्लोबिनचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. जे संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते. मात्र शरीरात लोहाचे प्रमाण कमी झाल्यास लाल रक्त पेशी तयार होऊ शकत नाही.
ज्यामुळे अॅनिमिया होण्याचा धोका असते. विशेषत: महिलांमध्ये हा आजार सर्वाधिक दिसते. शरीरातील रक्तपेशींच्या कमतरतेमुळे अॅनिमिया हा आजार होतो. मात्र लोहाच्या कमतरतेमुळे शरीरात होणारी लक्षणे सहसा समजत नाहीत.

लोहाच्या कमतरतेची लक्षणे

थकवा, अशक्तपणा, फिकट त्वचा, श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर येणे, डोकेदुखी, हृदयाचे ठोके वाढणे, छातीत दुखणे, हात-पाय थंड होणे, कावीळ, केस गळणे, तोंडाच्या बाजूंने त्वचेला भेगा पडणे, फोड्या येणे, घसा आणि जीभ सुजलेली दिसते, अशी लक्षणे दिसतात.

- Advertisement -

शरीरात लोहाचे प्रमाण किती असावे?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शरीरात लोहाचे प्रमाण हे त्या व्यक्तीचे वय, लिंग आणि एकूण आरोग्यावर अवलंबून असते. नवजात बालक आणि लहान मुलांना प्रौढांपेक्षा लोहाची सर्वाधिक गरज असते. कारण त्यांची शारीरिक वाढ वेगाने होत असते. मात्र लहान वयात मुला आणि मुलींना समप्रमाणात लोहाची आवश्यकता असते. यात ४ ते ८ वयोगटातील लहान मुलांना दररोज १० मिलीग्राम आणि ९ ते १३ वयोगटातील मुलांना ८ मिलीग्राम लोह आवश्यक असते.

यात महिलांनाही अधिक लोहाची गरज असते. कारण मासिक पाळीदरम्यान त्यांच्या शरीरातून बरेच रक्त बाहेर जात असते. त्यामुळे डॉक्टरांच्या मते, १९ ते ५० वयोगटातील महिलेने दररोज १८ मिलीग्रॅम लोहाचे सेवन करणे आवश्यक आहे. तर याच वयोगटातील पुरुषांनी केवळ ८ टक्के लोहाचे प्रमाण सेवन करावे. यात गरोदर किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांना किडनीचे आजार, अल्सर, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिसऑर्डर, वजन कमी करणारी शस्त्रक्रिया अशा अनेक समस्यांचा सामना करतात. ज्यामुळे अशा महिलांना भरपूर व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच शाकाहारी लोकांना जास्त प्रमाणात लोह घेण्याचे सांगितले जाते.

- Advertisement -

‘या’ गोष्टींमध्ये असते सर्वाधिक लोहाचे प्रमाण

चिकन, अंडी, मासे, चणे, मसूर, सुके वाटाणे, शेंगा जसे की बीन्स, पालक, हिरवे वाटाणे, ब्रोकोली, ब्रसेल्स स्प्राउट्स आणि संपूर्ण धान्यांमध्ये लोहाचे प्रमाण सर्वाधिक असते. या पदार्थांच्या सेवनातून शरीरात लोहाची कमतरता दूर करा, तसेच आहाराकडे विशेष लक्ष द्या.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -