घरमुंबईमलेरिया, डेंग्यूला आळा घालण्यासाठी महापालिका सज्ज, 'हा' करणार उपाय

मलेरिया, डेंग्यूला आळा घालण्यासाठी महापालिका सज्ज, ‘हा’ करणार उपाय

Subscribe

मुंबई:पावसाळ्यात मुंबईकर मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांनी बेजार होतात. महापालिका आरोग्य खात्याचे कीटकनाशक विभाग मलेरिया, डेंग्यू यांसारखे आजार पसरवणाऱ्या डासांचा उद्रेक रोखण्यासाठी विविध उपाययोजना करीत असते. मात्र यावेळी, पालिकेचा उपक्रम असलेल्या नवउद्यमींनी (स्टार्ट अप) मलेरिया, डेंग्यू यांच्या उत्पत्तीला कारणीभूत असलेल्या डासांची अंडी तात्काळ नष्ट होणार आहेत. त्यामुळे जर अंडीच नष्ट झाली तर डासांची पैदासच होणार नाही. मुंबईकरांना मलेरिया, डेंग्यू आजारांपासून मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

 

- Advertisement -

मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांना रोखण्यासाठी पालिका आरोग्य खाते, कीटकनाशक विभाग सदर आजारांना कारणीभूत ठरणा-या डासांचे निर्मूलन करण्यासाठी गप्पी माशांचा वापर करणे, धूम्रफवारणी, कीटकनाशकांची फवारणी करणे आदी उपाययोजना करते. पालिकेचा उपक्रम असलेल्या नवउद्यमींनी (स्टार्ट अप) मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांना कारणीभूत डासांची उप्तत्ती रोखण्यासाठी ‘इको बायो ट्रॅप’ या सापळ्याची निर्मिती केली आहे. त्याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या व्यवसाय विभागाच्या प्रमुख शशी बाला यांनी दिली आहे.

 

- Advertisement -

‘इको बायो ट्रॅप्स’ कसे काम करते ?
‘इको बायो ट्रॅप’ हे १००% पुनर्चक्रीकरण (रिसायकल) केलेल्या पुठ्ठ्यापासून बनवले जातात. या बायो ट्रॅप मध्ये ऍट्रॅक्टंट व कीटकनाशक यांचे मिश्रण असणारी एक छोटी पिशवी असते. डासांची मादी पाण्यात अंडी घालते, ही बाब लक्षात घेऊन या बायो ट्रॅप मध्ये पाणी टाकून ते डासांचा प्रादुर्भाव असणा-या ठिकाणी ठेवले जाते. ट्रॅपमध्ये असणा-या पिशवीतील ऍट्रॅक्टंट व कीटकनाशक (कीटक वाढ नियामक IGR ग्रॅन्युअल) हे पाण्यात तात्काळ मिसळले जातात. ज्यानंतर पाण्यातील ऍट्रॅक्टंटमुळे डासाची मादी या पाण्याकडे आकर्षित होते व पाण्यात अंडी घालते. तर पाण्यात असणारे कीटकनाशक डासांची अंडी नष्ट करते. अशाप्रकारे डासांची अंडीच नष्ट झाल्यामुळे डासांच्या भविष्यातील प्रजोत्पादनास प्रतिबंध होतो व पर्यायाने डासांपासून पसरणा-या आजारांना देखील प्रतिबंध होतो.

 

२०२१ मध्ये मलेरियामुळे जगभरात ६ लाख जणांचा मृत्यू
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) २०२२ च्या जागतिक मलेरिया अहवालात (www.who.int) २०२१ मध्ये मलेरियाची अंदाजे २४७ दशलक्ष प्रकरणे नोंदवली गेली आणि २०२१ मध्ये जगभरात मलेरियामुळे सुमारे ६ लाख १९ हजार दुर्दैवी मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -