घरताज्या घडामोडीआता 'दिघा' नाही 'दिघे' रेल्वे स्थानक; नाव बदलल्याने राजकीय वाद वाढला

आता ‘दिघा’ नाही ‘दिघे’ रेल्वे स्थानक; नाव बदलल्याने राजकीय वाद वाढला

Subscribe

नवी मुंबईतील ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा रेल्वे स्थानकाचे नाव बदलून दिघे ठेवण्यात आले आहे. दिघे रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर तशी कमान उभारण्यात आली आहे.रेल्वे स्थानकाचे कामपूर्ण होऊनही रेल्वे बोर्डाला महुर्त न मिळाल्याने उद्घाटन रखडले आहे. त्यातच दिघा रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यात आल्याने राजकीय कुरखोडया वाढल्या आहेत.

नवी मुंबई (ज्ञानेश्वर जाधव) : नवी मुंबईतील ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा रेल्वे स्थानकाचे नाव बदलून दिघे ठेवण्यात आले आहे. दिघे रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर तशी कमान उभारण्यात आली आहे.रेल्वे स्थानकाचे कामपूर्ण होऊनही रेल्वे बोर्डाला महुर्त न मिळाल्याने उद्घाटन रखडले आहे. त्यातच दिघा रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यात आल्याने राजकीय कुरखोडया वाढल्या आहेत. भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी दिघा रेल्वे स्थानकाचे नाव ‘दिघागांव’ नाव असावे अशी भूमिका घेतली आहे.तर राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शेवटच्या टप्प्यात रेल्वे स्थानकाचे नाव बदलुन दिघे ठेवण्यात आले आहे.त्यामुळे आता रेल्वे स्थानकाच्या बदलेल्या नावावरुन राजकीय वादंग सुरु झाले आहेत. तर या नव्या वादामुळे रेल्वे स्थानकाचे उद्घाटन लांबीवर पडणार असल्याचे बोलले जात आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन २०१६ मध्ये नवी मुंबईतील ऐरोली-कळवा एलिव्हेटेड पुल आणि दिघा रेल्वे स्थानक उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. एमआरव्हीसीच्या माध्यमातून दिघा रेल्वे स्थानकाच्या कामाची पूर्तता झाली आहे. मागील काही दिवसापासून दिघा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यासाठी एमआरव्हीसी, रेल्वे बोर्ड आणि राज्य शासनाकडून हालचालींना वेग आला आहे. मात्र शेवटच्या क्षणी दिघा रेल्वे स्टेशनचे नाव बदलून ‘दिघे’ ठेवण्यात आल्याने उद्घाटनाचा मुहूर्त लागण्या आधीच राजकीय ग्रहण स्थानकाला लागले आहे.

- Advertisement -

भारतीय जनता पार्टीच्यावतीने माजी खासदार डॉक्टर संजीव गणेश नाईक यांनी आमदार गणेश नाईक यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, रेल्वेचे डीआरएम अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठक घेऊन स्थानिक भूमिपुत्रांची नगरी असलेल्या दिघा परिसरात दिघाबाबा यांच्या नावे ग्रामस्थांच्या दैवताचे मंदिर आहे. त्यांची हीच ओळख कायम रहावी यासाठी दिघागांव नाव देण्याची मागणी केली आहे . ग्रामपंचायत कालीन सरकारी दप्तरी ‘दिघे’ असा उल्लेख आहे तर, त्यानंतर महापालिका अस्तित्वात आल्यानंतर दिघा विभाग अशी नोंद करण्यात आली आहे. आगामी कालावधीत पालिकेच्या महासभेत नावाचा प्रस्ताव मंजूर करून त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी आणि राज्य शासनाकडे त्यानंतर केंद्र सरकारकडे पाठवून रेल्वे स्थानकाला दिघा गाव या नावासाठी संघर्ष करू, असे माजी खासदार डॉ. नाईक यांनी सांगितले. याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

का झाला नावाचा गोंधळ?

- Advertisement -

रेल्वे आणि एमएमआरडीएने केलेल्या सॅटेलाइट सर्व्हेत नवी मुंबईतील या जागेचे नाव दिघेनगर असे दाखवण्यात आले आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा रेल्वे स्थानकाच्या नावा प्रमाणे पश्चिम बंगालमध्ये देखील दिघा नावाचे जुने रेल्वे स्थानक आहे. रेल्वे बोर्डाच्या नियमानुसार एकाच नावाचे एकच रेल्वे स्थानक असणे बंधनकारक आहे. त्यामुळे रेल्वे बोर्डाने या रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला, असल्याची माहिती सूत्रांनी दिली. रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनानंतर पहिल्या दिवशी दिघे रेल्वे स्थानक नावाचा फलक याठिकाणी लावण्यात आला होता. त्यानंतर तो बदलून दिघा करण्यात आला. त्यानंतरच्या सात वर्षात नावावर एकमत न झाल्याने रेल्वे बोर्डाने परस्पर दिघे रेल्वे स्थानक नाव निश्चित करून नव्या वादाला तोंड फोडले आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

नाव बदलू देणार नाही – खासदार राजन विचारे

ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे यांनी मागील महिन्यात दिघा रेल्वे स्थानकाच्या कामाचा आढावा घेतला होता त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याचा काही संबंध नसून नाव बदलू देणार नाही असे मत मांडले होते परंतु आता रेल्वे स्थानकाच्या नावात बदल झाल्यानंतर खासदार विचारे हे ‘दिघे’ या नावाला समर्थन देणार का? की वेगळी भूमिका मांडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

उदघाटन होऊ देणार नाही – मनसे

दिघा रेल्वे स्थानकाचे काम एमआरव्हीसी आणि रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे सात वर्षात रेल्वे स्थानकाचे नाव काय घ्यायचे याचा प्रश्न या दोन्ही प्रशासनाने सोडवलेला नाही. दिघा रेल्वे स्थानकाचे नाव दिघे करण्याचा घाट घालण्यात आला असून उद्घाटनापूर्वी स्थानिकांशी चर्चा करून नामांतराचा प्रश्न मार्गी न लागल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना रेल्वे स्थानकाचे उद्घाटन होऊ देणार नाही, असा इशारा मनसेचे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांनी दिला आहे.


हेही वाचा – बारसूतील लोकांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न सुरू; संजय राऊतांचा दावा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -