घरCORONA UPDATECorona Alert: दफनविधीही होणार; मलिकांच्या मागणीनंतर आयुक्तांनी निर्णय रद्द केला

Corona Alert: दफनविधीही होणार; मलिकांच्या मागणीनंतर आयुक्तांनी निर्णय रद्द केला

Subscribe

राज्यात कोरोनाचा विषाणूंचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या मृतदेहाचे दहन करण्यात येणार आहे. हा व्यक्ती कोणत्याही धर्माचा असला तरी त्याचे दहन होणार, असा निर्णय मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी घेतला होता. कोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्कारासाठी मुंबई महापालिकेने नियमावली केली होती. मात्र अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आयुक्तांशी संपर्क साधून काही गोष्टींची चर्चा केल्यानंतर हा निर्णय आता आयुक्तांनी रद्द केला आहे.

प्रवीण परदेशींच्या या निर्णयावर कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी आक्षेप घेतला. “कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी पालिकेने परिपत्रक जारी केले होते. मात्र मी त्यांच्याशी याबाबत बोललो. त्यांना या गोष्टी लक्षात आणून दिल्या. त्यानंतर पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी हे परिपत्रक मागे घेतलं आहे”, अशी माहिती नवाब मलिक यांनी ट्विटद्वारे दिली.

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या पत्रानुसार, कोरोना व्हायरसमुळे (Corona Dead bodies disposal) मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह दहन करण्यात येणार आहे. या दरम्यान कोणत्याही व्यक्तीच्या धर्माचा विचार करण्यात येणार नाही. त्यामुळे मृतदेह दफन करता येणार नाही, असा उल्लेख या नियमावलीत केला आहे.

- Advertisement -

तसेच जर मृताच्या नातेवाईकाने मृतदेह दफन करण्याची मागणी केली तर त्याला मुंबईच्या बाहेर जाऊन मृतदेह दफन करावा लागेल.यावेळी कोविड – १९ च्या सर्व नियमांचे पालन करावे लागेल. तसेच याविषयी मुंबई महापालिकेला सर्व लिहून द्यावं लागेल, असेही यात म्हटलंं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -