घरदेश-विदेशThackeray group : देशात बनवाबनवी, हुकूमशाहीचा उच्छाद; ठाकरे गटाचा घणाघात

Thackeray group : देशात बनवाबनवी, हुकूमशाहीचा उच्छाद; ठाकरे गटाचा घणाघात

Subscribe

भाजपाच्या खात्यात भ्रष्टाचाराचा पैसा जमा होतोय, पण गोरगरीब जनता मात्र हवालदिल आहे. या जनतेला आधार आणि आत्मविश्वास देण्याचे काम आता महाविकास आघाडीला करावे लागेल. मोदी यांचा खोटारडेपणा जनतेला दाखवून द्यावा लागेल. मतदारांनी या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा बोजवारा उडवून राजकीय वातावरण शुद्ध करण्याचे ठरवले आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

मुंबई : देशात एकाधिकारशाही, बनवाबनवी, हुकूमशाहीचा उच्छाद सुरू आहे. भाजपाचे नेते नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत पंतप्रधानपदावरून देशाचा कारभार हाकताना लोकशाही, संविधान, व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी केली. मोदी यांच्यासारखा नेता पुन्हा सत्तेवर आला तर, देशातील ही अखेरची निवडणूक ठरेल अशी भीती जनतेला वाटत होतीच, पण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतिराजांनीही हीच भीती व्यक्त केली आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने केली आहे. (Thackeray group: Thackeray group criticizes Modi government regarding electoral bonds)

मोदी हे पंतप्रधान म्हणून सपशेल अपयशी आणि खोटारडे ठरले आहेत. महागाईपासून रोजगारापर्यंत त्यांनी दिलेली सर्व आश्वासने म्हणजे थापेबाजी आणि जुमलेबाजीच ठरली. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची त्यांची भाषा वल्गनाच ठरली आणि आज मोदी हेच सर्व भ्रष्टाचाऱ्यांना त्यांच्या तंबूत घेऊन देशात खंडणीचे सगळ्यात मोठे वसुली रॅकेट चालवत आहेत. देशात ज्या पद्धतीची हुकूमशाही सुरू आहे ती पाहता हिटलरनेही मान खाली घातली असती, अशी टीका शिवसेना उद्ध बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Thackeray VS Thackeray : आम्हाला हुजरेगिरी मान्य नाही; राज ठाकरेंच्या टीकेला ठाकरे गटाचे प्रत्युत्तर

भाजपाच्या खात्यात भ्रष्टाचाराचा पैसा जमा होतोय, पण गोरगरीब जनता मात्र हवालदिल आहे. या जनतेला आधार आणि आत्मविश्वास देण्याचे काम आता महाविकास आघाडीला करावे लागेल. मोदी यांचा खोटारडेपणा जनतेला दाखवून द्यावा लागेल. मतदारांनी या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा बोजवारा उडवून राजकीय वातावरण शुद्ध करण्याचे ठरवले आहे. महाविकास आघाडी महाराष्ट्रात आणि इंडिया आघाडीने देशात लोकांची ‘मन की बात’ मान्य करून या शुद्धीकरणात जनतेला साथ देण्याचे ठरवले आहे, असा दावा ठाकरे गटाने केला आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांचे जागावाटप सुरळीत पार पडले. शिवसेना 21, काँग्रेस 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 10 असे जागावाटप सर्वांनी मान्य केले आणि त्याबाबतची घोषणा एकत्र पत्रकार परिषद घेऊन केली, हे महत्त्वाचे आहे. महाविकास आघाडीत बिघाडी वगैरे असल्याच्या अफवा आगलाव्यांकडून पसरविण्यात आल्या. त्यात काहीच तथ्य नव्हते. सर्वच पक्षांचे नेते ‘शिवालया’त एकत्र जमले आणि त्यांनी ऐक्याची गुढी उभारली. सामान्य माणसाच्या मनात जे होते तेच या नेत्यांनी समजूतदारपणा दाखवून केले, असेही या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा – BJP : मोदींच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवत…; महायुतीला पाठिंबा देताच भाजपाने राज ठाकरेंचे मानले आभार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -