घरमुंबईबोरिवलीत ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह; एकाचा मृत्यू तर दोन जखमी

बोरिवलीत ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह; एकाचा मृत्यू तर दोन जखमी

Subscribe

बोरीवलीमध्ये ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची घटना घडली आहे. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोरिवलीमध्ये ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची घटना घडली आहे. बोरीवलीच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर शनिवारी रात्री ही घटना घडली आहे. मित्रांसोबत मद्यप्राशन करुन कार चालविताना चालकाने पुढे जाणार्‍या एका कारला जोरात धडक दिली. या अपघातात मद्यपी कारचालकाचा मृत्यू झाला. अजीत आरगडे (२७ वर्ष) असं या कारचालकाचे नाव आहे. तर त्याचे दोन्ही मित्र रविंद्र जांभळे आणि निलेश भातुसे हे जखमी झाले आहेत. हलगर्जीपणाने गाडी चालवून स्वत:च्या मृत्यूला आणि इतर दोन मित्रांना दुखापत होण्यास कारणीभूत ठरवल्याप्रकरणी अजीतविरोधात कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी घडली घटना

बोरिवलीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळील ठाकूर कॉम्प्लेक्स ब्रिज शनिवारी रात्री १० वाजता ही घटना घडली. अजीत हा मूळचा साताराचा रहिवाशी असून चालक म्हणून मुंबईत काम करत होता. शनिवारी तो त्याच्या मित्रांसोबत होता या तिघांनी मद्यप्राशन केले होते. अजीतने भरपूर मद्यप्राशन केल्याने त्याला कार चालविता येत नव्हती. याबाबत त्याच्या दोन्ही मित्रांनी कार नीट चालवशील का अशी विचारणा केली होती. मात्र आपण ओके असे सांगत त्याने कार चालविण्याचा प्रयत्न केला. अ‍ॅनेक्स मॉलजवळील पृथ्वी अ‍ॅव्हेन्यू इमारतीसमोरच येताच त्याने पुढे जाणार्‍या एका कारला जोरात धडक दिली. त्यानंतर त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार ब्रिजच्या भिंतीला जाऊन धडकली.

- Advertisement -

मृत कारचालकाविरोधात गुन्हा दाखल

या अपघातात कारमधील तिघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच कस्तुरबा मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी तिघांनाही पोलिसांनी जवळच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. तिथे अजीतला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी समर देवनाथ यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अजीतविरुद्ध गुन्हा नोंदविला. लवकरच त्याच्या दोन्ही मित्रांची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे. यातील रविंद्र हा बोरिवलीतील देवीपाडा तर निलेश हा कांदिवलीतील सिद्धीविनायक चाळीत राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -