घरमहाराष्ट्रनाशिकमुंबई - नाशिक महामार्गावर भरधाव कारची दोन वाहनांना धडक; विचित्र अपघातात दोघांचा...

मुंबई – नाशिक महामार्गावर भरधाव कारची दोन वाहनांना धडक; विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू

Subscribe

मुंबई- नाशिक महामार्गावर सातत्याने अपघातांचे सत्र सुरु आहे. त्यामुळे हा महामार्ग आहे की मृत्यूचा सापळा असा प्रश्न आता प्रवाशांना पडत आहे. कारण आज सकाळी मुंबई नाशिक महामार्गावरील शहापूरजवळील कुमार गार्डन हॉलजवळ एक भीषण अपघात झाला. मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या कार, रिक्षा आणि स्कूटी अशा तीन गाड्यांची आपापसात भीषण धडक झाली. या विचित्र अपघातात स्कूटी आणि रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. भरधाव येणाऱ्या कारने स्कूटी आणि रिक्षाला धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. यात आठ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शहापूरमधील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- नाशिक महामार्गावरील शहापुरजवळ आज सकाळी एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारने रिक्षा आणि स्कूटीला जोरदार धडक दिली. यामुळे तीनही वाहनं एकमेकांवर आढळली. ज्यात आठ जण जखमी झाले आहेत. तर शहापूरहून नाशिकच्या दिशेने स्कुटीने येत असलेल्या आश्विनी गोळे यांचा मृत्यू झाला आहे. तसेच रिक्षातील एक महिला प्रवाश्याची देखील या अपघातात जीव गमावला. या अपघातात तिनही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी धाव घेत जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले, या प्रकरणाचा सध्या पोलीस तपास सुरु आहे.

- Advertisement -

या अपघातामुळे महामार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे आता अपघातग्रस्त वाहनांना रस्त्यावरून बाजूला हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या विचित्र अपघातात सर्व जखमींना उपचारांसाठी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अलीकडेच मुंबई – नाशिक महामार्गावरील गंगा देवस्थानजवळील ब्रिजवर 3 गाड्यांच्या धडकेमुळे विचित्र अपघात झाला, या अपघातात दोन जण जखमी झाले. एक भरधाव कंटेनर आधी महामार्गावर पलटी झाला. यानंतर अपघातग्रस्त कंटेनरला मागून येणारा कंटेनर धडकला आणि पुन्हा एक आयशर टेम्पो येऊनही धडकला. असा हा तीन गाड्यांचा विचित्र अपघात झाला होता. या घटनेनंतर सातत्याने या महामार्गावर अपघातांचे सत्र सुरु आहे, त्यामुळे पोलिसांना वाहन चालकांना सावकाश गाडी चालवा असे आवाहन करणारे फलक लावले होते. असे असतानाही आज पुन्हा तीन गाड्यांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात दोन महिलांनी आपला जीव गमावला आहे.


तरुणांनी करायचं काय? बेरोजगारीचा 16 महिन्यांतील उच्चांक, ‘या’ दहा राज्यांत नोकऱ्यांची वानवा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -