घरमुंबईVideo: सिनेमात शोभावा असा फाईट स्टंट घडलाय भिवंडी टोलनाक्यावर

Video: सिनेमात शोभावा असा फाईट स्टंट घडलाय भिवंडी टोलनाक्यावर

Subscribe

नाशिक महामार्गावर पडघा या ठिकाणी टोल नाका असून सदरच्या टोलनाक्यावर कर्माचाऱ्यांकडून वाहन चालकांसोबत वाद होऊन मारहाणीच्या घटना नेहमीच घडत असतात. मारहाणीची एक घटना नुकतीच इथे घडली आहे. एका प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्यामुळे या टोलनाक्यावरील कर्माचाऱ्यांची गुंडगिरी समोर आली आहे. दुर्दैव म्हणजे या बाबत पडघा पोलीस ठाण्यात कोणत्याही तक्रारीची अद्याप नोंद झालेली नाही.

मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी तालुक्यातील पडघा येथे टोलनाका आहे. येथे लाखो रुपयांची टोल वसुली करण्यासाठी कर्मचारी सदैव दादागिरी करत असतात. त्यातच या टोलनाक्यावरून जात असलेल्या दोन वाहन चालकांमध्ये वाद झाला असता तो सोडविण्यास गेलेल्या टोलनाका कर्मचाऱ्यास वाहन चालकांनी मारहाण केली. त्यामुळे संतप्त झालेल्या टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी त्या वाहन चालकांना बेदम मारहाण केली. दरम्यान त्याच सुमारास त्या ठिकाणाहून जाणाऱ्या एका वाहनचालक प्रवाशाने या मारहाणीचा थरार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सदर घटना समोर आली आहे. दरम्यान याबाबत पडघा पोलिसांशी संपर्क साधला असता घटनेबाबत कोणीही तक्रार देण्यास आले नसून कोणताही गुन्हा दाखल नसल्याची माहिती दिली जात आहे.

- Advertisement -

भिवंडीच्या पडघा टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांची वाहनचालकांना जबर मारहाण | #MyMahanagar

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 15, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -