घरमुंबईउद्यानाच्या उद्घाटन कार्यक्रमात ध्वनिप्रदूषण नगरसेवका विरुद्ध गुन्हा दाखल

उद्यानाच्या उद्घाटन कार्यक्रमात ध्वनिप्रदूषण नगरसेवका विरुद्ध गुन्हा दाखल

Subscribe

उल्हासनगर येथील एका उद्यानाच्या उद्धघाटन कार्यक्रमात बेकायदेशीर कर्णकर्कश वाद्ये वाजवून तसेच फटाके फोडून ध्वनी आणि वायू प्रदूषण केल्याप्रकरणी स्थानिक नगरसेवक शेरी लुंड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगर- ४ येथील व्हीनस चौकात माणेरा गावाला जाणाऱ्या रस्त्याजवळ साई वसनशाह हे उद्यान महानगरपालिकेकडून बनविण्यात आले आहे. या उद्यानाच्या उदघाटनाचा कार्यक्रम ५ मार्च २०१९ ला सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमा दरम्यान, कर्णकर्कश वाद्ये वाजवून तसेच फटाके फोडून ध्वनी आणि वायू प्रदूषण केल्याप्रकरणी स्थानिक नगरसेवक शेरी लुंड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगर अंबरनाथ शहरात ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात लढा देणाऱ्या सरिता खानचंदानी यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार केली होती. या कार्यक्रमाला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महापौर, मनपा आयुक्तांसह नगरसेवक शेरी लुंड आणि अन्य व्यक्ती उपस्थित होते.

हिराली फाउंडेशनची तक्रार

या कार्यक्रमात मोठया प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत असल्याची माहिती हिराली फाउंडेशनच्या अध्यक्षा सरिता खानचंदानी यांना मिळाली होती. यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी या कार्यक्रमात कर्णकर्कश वाद्ये वाजवून मोठया प्रमाणात ध्वनी प्रदूषण करण्यात येत होते. त्याचप्रमाणे मोठया आवाजाचे आणि रोषणाई करणारे फटाके फोडण्यात येत होते. खानचंदानी यांनी त्वरित यासंदर्भात ट्विटरच्या माध्यमातून संबंधित मंत्री, पोलीस प्रशासन, मनपा प्रशासन यांना तक्रारी केलेल्या. या घटनेचे त्यांनी व्हिडीओ रेकॉर्डिंग करुन ध्वनी आणि वायू प्रदूषण मापन यंत्राद्वारे प्रदूषणाचा स्तर खूप जास्त असल्याचे सिद्ध केले.

- Advertisement -

तक्रार दाखल

या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. या प्रकरणी बुधवारी साई पक्षाचे नगरसेवक शेरी लुंड यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात शेरी लुंड यांना विचारले असता प्रतिक्रिया देताना मला नुकतीच ही माहिती मिळाली आहे , पूर्ण माहिती घेतल्यानंतर मी माझी बाजू मांडेन असे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -