घरCORONA UPDATEविक्रोळी येथे २५ ICU तर ७५ ऑक्सिजन बेडचं सेंटर

विक्रोळी येथे २५ ICU तर ७५ ऑक्सिजन बेडचं सेंटर

Subscribe

२७ एप्रिल रोजी होणार उद्धाटन

मुंबईत सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे रुग्ण संख्येत काहीशी वाढ झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांना क्वारंटाईन सेंटरमध्ये बेड मिळण्यास अडचणी येतात. घरीच क्वारंटाईन व्हायचे झाले तर झोपडपट्टीमध्ये, एसआरए इमारतीत कमी जागेच्या घरात ते शक्य होत नाही. स्वतंत्र शौचालय व अन्य काही सुविधा मिळण्यात अडचणी उद्भवतात.
नेमकी हीच अडचण लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या व घाटकोपर ( पूर्व) येथील नगरसेविका राखीताई जाधव यांनी अथक प्रयत्न करून गोदरेज कंपनी आणि पालिकेच्या सहकार्यातून विक्रोळी ( पूर्व) येथील गोदरेज कम्युनिटी हॉलमध्ये २५ इंटेन्सिव्ह केअर युनिटसह (आयसीयू) ७५ ऑक्सिजन बेडचं सेंटर निर्माण केले आहे.
या सेंटरचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्याचे पर्यावरण मंत्री व मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते २७ एप्रिल रोजी होणार आहे.

या सेंटरमध्ये, सौम्य लक्षणांसह आजार बळावलेल्या रुग्णांवरही तातडीचे उपचार केले जातील. आपल्या विभागातील नागरिकांसाठी याठिकाणी डॉक्टर्स, परिचारक, वैद्यकीय कर्मचारी यांची फळी उभारून अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याचा माझा प्रयत्न आहे. या सुविधांचा लाभ घेऊन कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वांचे योग्य सहकार्य अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हेदेखील नागरिकांना आवश्यक सेवा सुविधा देण्यासाठी कायम तत्पर असतील, असे राखीताई जाधव यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

गेल्या वर्षी, ऑक्सिजन सेंटर आणि आयसोलेशन सेंटर या सुविधा विभागातील नागरिकांना सर्वप्रथम देण्यात आल्या होत्या. मात्र आता कोविडच्या दुसऱ्या लाटेत दुर्दैवाने प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. या महामारीविरुद्ध आपल्याला कंबर कसावी लागणार आहे. कोरोनाबाधित रुग्णांना क्वारंटाईन सेंटरमध्ये बेड मिळण्यास येत असलेल्या अडचणी आणि रुग्णांना घरीच क्वारंटाइन होण्यासाठी योग्य जागा व सुविधा याबाबत येणाऱ्या होणारी अडचणी लक्षात घेता सदर रुग्णांना सर्व प्रकारच्या सुविधा बहाल करण्यासाठीच गोदरेज कंपनी आणि पालिकेच्या सहकार्यातून विक्रोळी ( पूर्व) येथील गोदरेज कम्युनिटी हॉलमध्ये २५ इंटेन्सिव्ह केअर युनिटसह (आयसीयू) ७५ ऑक्सिजन बेडचं सेंटर निर्माण केले आहे, असे राखीताई जाधव यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – Oxygen Express:रेल्वेची ‘लाईफलाईन’ ही ओळख सार्थकी, ऑक्सिजन एक्सप्रेस कळंबोलीत दाखल

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -