घरमुंबईसावधान! गणेशोत्सवासाठी चायनीज अगरबत्त्या बाजारात; वापर टाळा

सावधान! गणेशोत्सवासाठी चायनीज अगरबत्त्या बाजारात; वापर टाळा

Subscribe

कोरोनाचा काळ असला, तरी लाडक्या बाप्पाचा उत्सव कमी प्रमाणात का होईना साजरा करण्यासाठी गणेशभक्त तयार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर बाजारात गणेशोत्सवाशी संबंधित अनेक वस्तू येऊ लागल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने लक्ष असेल ते चीनी वस्तूंवर! चीनसोबत ताणल्या गेलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर चीनी वस्तूंचा बहिष्कार करण्याचं मत भारतात व्यापक प्रमाणावर तयार झालं आहे. त्यातच आता गणेशोत्सवात चीनी बनावटीच्या अगरबत्त्या बाजारात आल्या आहेत. या अगरबत्त्यांमध्ये वापरण्यात आलेल्या केमिकलमुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळे अशा अगरबत्त्यांपासून लांबच राहण्याचा सल्ला दिला जात आहे.

खूप जास्त सुवास येणाऱ्या, लांबीला जास्त, गोल्डन/सिल्व्हर रंगाच्या, मशिनवर तयार केलेल्या, संख्येने जास्त मात्र किंमतीने कमी अशा या चायनीज अगरबत्त्या विक्रेत्यांना आणि ग्राहकांना भुरळ घालत आहेत. पण अशा अगरबत्त्या पेटवल्यानंतर त्यांच्या केमिकलयुक्त धुरामुळे श्वास घेताना त्रास होतो. ड्राऊजीनेस जाणवतो. मेंदू बधीर होतो, असं दिसून आलं आहे. तसेच या अगरबत्त्या जळाल्यानंतरही राखेमध्ये त्यातील सोनेरी/चंदेरी रंग तसाच रहातो. घरातल्या देव्हाऱ्यातील किंवा मंदिरातील अंगारा/विभूती कपाळाला लावून तेच बोट आपण जिभेवर टेकवतो. त्यामुळे अत्यंत घातक अशा केमिकल्सयुक्त राखेने आपल्याला दमा, टीबी, कॅन्सर किंवा नपुंसकता यासारखे दुर्धर आजार होण्याची शक्यता वाढते.

- Advertisement -

केमिकलयुक्त अगरबत्तीच्या वासामुळे आणि धुरामुळे फुफ्फुसाचे आजार मोठ्या प्रमाणात वाढतात. वयोवृद्ध व्यक्ती आणि दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तीला अशा प्रकारच्या अगरबत्तीच्या धुराच्या संपर्कात आल्यानंतर अन्ननलिकेला त्रास होतो. दरम्यान, खोकला आणि दम्यामुळे सदरची व्यक्ती कॅन्सर या आजाराने त्रस्त होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या अगरबत्त्या, धूप, उदबत्त्या वापरू नयेत, असे सीएसटी येथील सेंट जॉर्ज रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. मधुकर गायकवाड यांनी दैनिक आपलं महानगरशी बोलताना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -