घरमुंबई'राम कदम, आमच्या पोटावर पाय का देताय?'

‘राम कदम, आमच्या पोटावर पाय का देताय?’

Subscribe

दहीहंडीच्या वेळी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आधीच विरोधकांच्या निशाण्यावर असणारे राम कदम आता आणखीन अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. राम कदम यांनी सिने डान्सर्स असोसिएशनसारखीच स्वतंत्र संस्था स्थापन केल्यामुळे या असोसिएशनचे सदस्य नाराज झाले आहेत.

भाजप आमदार राम कदम यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता सर्वच स्तरातून उमटू लागले आहेत. ट्विटवरून माफी मागून या वादावर पडदा पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला खरा, पण विरोधकांनी सुरू ठेवलेला विरोध आणि सोशल मीडियावर बनत असलेले मीम यामुळे हा विषय अजूनही शमण्याचं नाव घेत नाहीये. एकीकडे विरोधक राम कदमांच्या राजीनाम्यावर ठाम असतानाच दुसरीकडे काही महिला डान्सर्स राम कदम यांच्याविरोधात आता आवाज उठवू लागल्या आहेत. राम कदम यांच्या अध्यक्षतेखाली सिने डान्सर्स असोसिएशनप्रमाणेच आणखीन एक असोसिएशन स्थापन करण्यात आली आहे. सिने डान्सर असोसिएशनच्या सगळ्या मुला-मुलींनी एक असोसिएशन असताना दुसरी स्थापन करण्याचा अट्टाहास का? असा सवाल केला आहे.

काय आहे प्रकरण?

१९६१ साली मुंबईत सिने डान्सर असोसिएशनची स्थापना झाली. या असोसिएशन अंतर्गत डान्सर मुला मुलींना कार्ड काढून देण्यात आले. साधारण तीन लाख रुपये घेऊन हे कार्ड मुला-मुलींना दिले जाते. हे कार्ड असणाऱ्या मुला-मुलींना बॉलिवूड चित्रपटात बॅक डान्सर म्हणून घेतलं जाऊ लागलं. सध्या या असोसिएशनकडे एक हजाराहून अधिक मुलं आहेत. या मुलांना दिवसाला ४ हजार रुपये असे मानधन दिले जाते. जितके दिवस शुटींग सुरू असते तेवढ्या दिवसांचे त्यांना मानधन मिळते. साधारण तीन लाखांपर्यंत पैसे घेऊन हे कार्ड या मुला-मुलींना दिले जाते.

- Advertisement -

तुम्ही हे पाहिलंत का? – राम कदमांचं वादग्रस्त वक्तव्य आणि सोशल मीडियावर जोक्सचा पाऊस


कोणती आहे दुसरी संस्था?

ऑल इंडिया स्क्रीन डान्सर असोसिएशन अशी डान्सर्सची दुसरी असोसिएशन राम कदम यांनी स्थापन केली. या असोसिएशन अंतर्गत मुला-मुलींना कमी पैशात कार्ड काढून दिले जातात. त्या मुलांना दिवसागणिक केवळ दीड हजार ते दोन हजार रूपये मानधन दिले जाते. या मुलांचे मानधन कमी असल्यामुळे बॉलिवूडमध्ये गाण्यामध्ये या मुलांना कॉरिओग्राफर प्राधान्य देतात. त्यामुळे कमी पैशात त्यांचं काम होतं. त्यामुळे सिने डान्सर असोसिएशनच्या कार्डधारी मुलांना डान्ससाठी न घेता ऑल इंडिया स्क्रीन डान्सर असोसिएशनच्या मुलांना आता नवीन चित्रपटांसाठी घेतले जाते, असा दावा या मुलांकडून केला जात आहे.

मुळात एक असोसिएशन असताना, दुसऱ्या असोसिएशनची काय गरज आहे? गेली अनेक वर्ष आम्ही याच असोसिएशनमधून डान्स करत आहोत. राम कदम यांनी ही दुसरी संस्था स्थापन केली. नवीन येणाऱ्या मुलांना या संस्थेकडून कमी पैशात कार्ड काढून दिले जातात. आम्हाला असं वाटतं हे लोक केवळ पैसे खाण्यासाठी आम्हाला डावलत आहेत. त्यांना कमी पैशात काम करणारी मुलं आता मिळाली आहेत. दिवस दिवस उन्हात त्या मुलांकडून काम करून घेतलं जातं. तरीही ती मुलं कमी पैशात काम करतात. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आम्ही अकराशे मुलं घरी बसलो आहोत.

– अॅना डिसिल्वा, सिने डान्सर असोसिएशन

- Advertisement -


हेही वाचा – राम कदम पुन्हा एकदा बोलले आणि फसले!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -