घरमुंबईमेट्रोेच्या कामांमधील राडारोडा पावसाळ्यापूर्वी साफ करा

मेट्रोेच्या कामांमधील राडारोडा पावसाळ्यापूर्वी साफ करा

Subscribe

मुंबईत सध्या मेट्रोे रेल्वेची कामे जलदगतीने सुरु असून त्यासाठी केलेल्या खोदकामाचा राडारोडा रस्त्यांवर पसरल्याने येत्या पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यात अडचणी संभवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाण्याचा निचरा न झाल्याने रस्त्यांवर पाणी साचले जाण्याची शक्यता असल्याने महापालिका आयुुक्तांनी ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ला (एमएमआरडीए) निर्देश देत रस्त्यांवरील हा राडारोडा उचलण्याच्या सूचना केल्या आहेत. एमएमआरडीए आणि महापालिकेच्या अधिकार्‍यांमध्ये समन्वय चांगल्या प्रकारे राखण्यासाठी ‘एमएमआरडीए’चे माजी अतिरिक्त महानगर आयुक्त आणि महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.

येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध शासकीय तसेच निमशासकीय यंत्रणांशी सुसमन्वय साधण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश शनिवारी झालेल्या मासिक आढावा बैठकीत महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले. यामध्ये प्रामुख्याने ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ व ’मुंबई मेट्रो’ यांच्याद्वारे सुरु असलेल्या विविध कामांमधून निर्माण होणारा गाळ तसेच राडारोडा महापालिकेच्या पावसाचे पाणी वाहून नेणार्‍या पर्जन्यजल वाहिन्यांमध्ये वाहून आल्यास त्यामुळे वाहिन्या तुंबण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन कोणत्याही परिस्थितीत मेट्ोच्या कामांमधील गाळ तसेच राडारोडा महापालिकेच्या पर्जन्यजल वाहिन्यांमध्ये वाहून येणार नाही, याची काळजी घेतली जावी,अशाप्रकारच्या सूचना त्यांनी केली आहे.

- Advertisement -

‘एमएमआरडीए’ तसेच ‘मुंबई मेट्रो’ इत्यादींच्या कामांमधून निर्माण होणार्‍या गाळाची तथा राडारोड्याची विल्हेवाट योग्यप्रकारे लावली जाते किंवा नाही याची खातरजमा संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी नियमितपणे व वेळोवेळी करून घ्यावी,असेही निर्देश आयुक्तांनी अधिकार्‍यांनी दिले आहे. यासाठी ‘एमएमआरडीए’, ‘मुंबई मेट्रो’ व मुंबई महानगरपालिकेतील संबंधित अधिकार्‍यांची समन्वयनात्मक बैठक आयोजित करण्याचे निर्देशही अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) प्रविण दराडे यांना महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -