घरCORONA UPDATEवाधवान प्रकरणी कारवाई करण्यास दिरंगाई का?; मुख्यमंत्र्यांच्या नाराजीची चर्चा

वाधवान प्रकरणी कारवाई करण्यास दिरंगाई का?; मुख्यमंत्र्यांच्या नाराजीची चर्चा

Subscribe

वाधवान प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत फोनवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

राज्यात वाधवान कुटुंबियांच्या महाबळेश्वर प्रवासाचे प्रकरणी आता आणखीनच गंभीर होत चालले आहे. यामध्ये आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातले असून यासंबंधी ताबडतोब कारवाई का केली नाही, म्हणून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते. तसेच कोरोनाच्या संकटावेळी हे भलते संकट सरकारसमोर उभे राहल्याने त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचेही सूत्रांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे हे प्रकरण आता आणखीनच गंभीर होणार यात शंका नाही. वाधवान कुटुंबियांसह २३ जणांनी ५ गाड्यांमधून खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास केला. त्यासाठी त्यांनी प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या पत्राचा आधार घेतला. हे प्रकरण उघड झाल्यापासून देशात लॉकडाऊन असताना सरकार एका उद्योगपतीला प्रवासाची परवानगी देतातच कसे, असा सवाल विरोधक करू लागले. त्यामुळे विरोध आणि सरकार यांच्याकडून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा – कोरोनापासून वाचण्यासाठी अमेरिकेने खरेदी केल्या १९ लाखाच्या बंदुका

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष 

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाधवान प्रकरण उघड झाल्यानंतर प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना चौकशी संपेपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. मात्र ही कारवाई कालच का नाही केली, यावरून मुख्यमंत्र्यांनी आपली नाराजी शरद पवार यांच्याकडे नोंदवली आहे. शिवाय गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी विरोधकांकडे होत असून त्यालाही ठाकरे सरकारला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, कोणत्याही आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात. त्यांनी एखाद्या आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्याचे निलंबन केल्यास त्याबाबत कारणांसहीत केंद्र सरकारला कळवायचे असते. केंद्राकडून ती माहिती युपीएससीकडे पाठवली जाते. त्यामुळे मुख्यमंत्री या प्रकरणी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – Coronavirus: कोरोनावर औषध शोधण्यासाठी शास्त्रज्ञांना हवंय ‘आईचं दूध’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -