घरCORONA UPDATEकोरोनापासून वाचण्यासाठी अमेरिकेने खरेदी केल्या १९ लाखाच्या बंदुका

कोरोनापासून वाचण्यासाठी अमेरिकेने खरेदी केल्या १९ लाखाच्या बंदुका

Subscribe

कोरोनापासून वाचण्यासाठी अमेरिकेने १९ लाखाच्या बंदुका खरेदी केल्या आहेत.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने महासत्ता असलेल्या बलाढ्य देशाला देखील घेरले आहे. आतापर्यंत ४ लाख ६८ हजार ८८७ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मृतांचा आकडा १६ हजार ६९७ इतका झाला आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनाशी हा देश लढत असताना दुसरीकडे या देशातील नागरिकांनी कोरोनापासून वाचण्यासाठी १९ लाखांच्या बंदुका खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. या देशांने इतिहासात दुसऱ्यांदा एवढ्या मोठ्या संख्येने दारुगोळा खरेदी केला आहे.

…म्हणून खरेदी केल्या आहेत बंदूका

सध्या कोरोनाने अमेरिकेत रूद्ररुप धारण केले आहे. अनेकांचे या कोरोना विषाणूमुळे बळी जात आहेत. यामुळे अमेरिकेतील सर्व यंत्रणा कामाला लावली आहे. त्यामुळे सुरक्षितेच्या दुष्टीकोनातून बंदुका खरेदी केल्या जात आहे. कारण अशा परिस्थितीत खाण्यापिण्यासाठी आणि औषधांसाठी लुटमार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षतेच्या हेतून नागरिकांकडून बंदुकांची खरेदी केली जात आहे.

- Advertisement -

इतिहासात दुसऱ्यांदा खरेदी केल्या बंदुका

अमेरिकेत दुसऱ्यांदा एवढ्या मोठ्या संख्येने बंदुका खरेदी करण्यात आल्या आहेत. यापूर्वी २०१३ साली शाळेत गोळीबार झाला होता. त्या दरम्यान, मोठ्या संख्येने बंदुका खरेदी करण्यात आल्या होत्या.

२४ तासात १ हजारहून अधिक मृत्यू

अमेरिकेत कोरोनाने अक्षरश: कहर केला आहे. अमेरिकेत कोरोनांच्या बळींची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. २४ तासात १ हजार ९०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता अमेरिकेत भीतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अमेरिकेत कोरोनाचे थैमान! २४ तासात १ हजार ९०० बळी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -