घरमुंबईमुंबईत परवडणारी घरे बाधणारे एकच 'नियोजन प्राधिकरण'

मुंबईत परवडणारी घरे बाधणारे एकच ‘नियोजन प्राधिकरण’

Subscribe

राज्यातील अनेक विकास संदर्भात खात्यांकडून आढावा घेण्यास सुरुवात केलेली असून राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज, मुंबई महापालिकेच्या प्रश्नांबाबत महापालिका मुख्यालयात येऊन अधिकार्‍यांकडून आढावा घेतला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचा तसेच मुंबई २०३० अंतर्गत करण्यात येणार्‍या कामांचा आढावा गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील, असे मत स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी परवडणारी घरे बांधण्यासाठी झोपडपट्टी प्राधिकरण, महापालिका, म्हाडा, नगर विकास अशा विविध यंत्रणा काम करत आहेत. याऐवजी मुंबईसाठी एकच प्राधिकरण करण्यासंदर्भात विचार करण्यात येईल,असे मतही या बैठकीत व्यक्त करत सुतोवाच केला आहे.

मुंबईतील रस्ते कायमचे खड्डेमुक्त व्हावेत

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील अनेक विकाससंदर्भात खात्यांकडून आढावा घेण्यास सुरुवात केलेली असून गुरुवारी त्यांनी मुंबई महापालिकेच्या प्रश्नांबाबत महापालिका मुख्यालयात येत अधिकार्‍यांकडून आढावा घेतला.  मुंबई महापालिकेच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयातील आपत्कालिन नियंत्रण कक्ष दुपारी १ वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात ३ वाजता मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहिले. या बैठकीत मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासंदर्भात नगर विकास खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्याकडील विकास आराखड्यातील प्रलंबित प्रश्न, एसआरए आणि एमएमआरडीए यांच्याकडीलसर्व प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत  समन्वय प्रकरणांचा आढावा, मुंबई २०३० व्हीजनचे सादरीकरण तसेच मुंबईतील रस्ते कायमचे खड्डेमुक्त व्हावेत याबाबतची धोरणे आदी प्रश्नांबाबत संबंधित अधिकार्‍यांकडून आढावा घेण्यात आहे.

- Advertisement -

महानगरपालिकेमध्ये झालेल्या आढावा बैठकीत महापालिकेच्या आवश्यक प्रकल्पांसाठी आर्थिक स्वावलंबन, बदलत्या हवामानास तोंड देण्यासाठी तयारी, पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी भुयारी टनेल बांधणे, नागरिकांच्या तक्रारीसंदर्भात महापालिकेने केलेली कार्यवाही, बेस्टची व्यवस्था, खड्डेमुक्त रस्त्यासंदर्भातील कार्यवाही, आदींबाबत सादरीकरण करण्यात आले. तसेच गारगाई धरण प्रकल्प, मुंबई मलनिःस्सारण प्रकल्प, मुंबई किनारा रस्ता प्रकल्प, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, बेस्टच्या अर्थसहाय्यासाठी विद्युत निर्मिती प्रकल्प या पालिकेच्या नियोजित प्रकल्पांबद्दलही यावेळी चर्चा झाली. महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी सादरीकरण केले.

सार्वजनिक शौचालये उभारावीत

मुंबईच्या जनतेला पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा, यासाठी जुने पाईपलाईन बदलण्याची गरज आहे. स्ट्रिट फर्निशिंग अंतर्गत मुंबईतील रस्त्यांवरील चिन्हेही एकसमान असावीत. तसेच रस्त्यांची, मंडईची रचना एकसमान करता येईल का याबद्दलही विचार करण्यात यावा, अशाही उध्दव ठाकरे यांनी सूचना केल्या. पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गाच्या उड्डाण पुलाखालील जागांची स्वच्छता करण्यात यावी. याठिकाणी सार्वजनिक शौचालये उभारावीत अथवा त्या जागांचे सौंदर्यीकरण करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केल्या. पर्यटन वाढीसाठी विविध उपाययोजनांवरही यावेळी चर्चा झाली. मंत्री जयंत पाटील यांनी मुंबईतील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचना यावेळी केली.

- Advertisement -

या बैठकीला मुख्य सचिव अजोय मेहता, प्रधान सचिव सिताराम कुंटे,महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी, नगरविकासचे सचिव नितीन करीर, एमएमआरडीएचे आर.ए.राजीव,यांच्यासह महापालिकेचे प्रविण दराडे, विजय सिंघल, डॉ. अश्विनी जोशी,आबासाहेब जर्‍हाड आदी अतिरिक्त आयुक्तांसह रस्ते अभियंता संजय दराडे, पर्जन्य जलअभियंता विभागाचे प्रममुख अभियंता संजय जाधव, विकास व नियोजन विभागाचे प्रमुख अभियंता विनोद चिठोरे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अभियंता, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.पद्मजा केसकर आदी अधिकारीच या बैठकीला उपस्थित होते.


हेही वाचा – पक्षादेश न पाळणाऱ्या नगरसेवकांविरूद्ध अपात्रतेची कारवाई करा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -