घरमुंबईमुंबईत उद्यापासून CNG गॅसमध्ये वाढ; घरगुती गॅसदेखील महागणार

मुंबईत उद्यापासून CNG गॅसमध्ये वाढ; घरगुती गॅसदेखील महागणार

Subscribe

मुंबईकरांच्या खिशाला उद्यापासून अधिकची कात्री लागणार आहे. कारण महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी गॅसच्या किंमतीत वाढ केली आहे. शिवाय, घरगुती गॅसमध्ये देखील वाढ केली आहे. सीएनजी किंमतीत १.५ रु. किग्रॅ आणि घरगुती पीएनजी किंमतीत ०.९५ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आज मध्यरात्री पासून नवे दर लागू होतील, असं महानगर गॅसने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

महानगर गॅस लिमिटेडने एक निवेदन जारी केलं आहे. यामध्ये नव्या दरांची माहिती दिली आहे. महानगरने सीएनजी गॅसमध्ये वाढ केली आहे. सीएनजी किंमती १.५ रुपये प्रति किलोग्रॅम वाढ केली आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात सीएनजी आणि घरगुती पीएनजीच्या गॅसवर सर्व करांसह सुधारित वितरित किंमत रुपये ४९.४० किलो आणि रुपये २९.८५/एससीएम (स्लॅब १) आणि ३५.४५ / एससीएम (स्लॅब २) असेल. मुंबईतील सध्याच्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांपेक्षा महानगर गॅस सीएनजीवर ६२ आणि ४१ टक्के इतकी आकर्षक बचत देत आहे.

- Advertisement -

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा भडका

आज मुंबईत पेट्रोलचा भाव ९३.४४ रुपये आहे. एक लीटर डिझेलचा भाव ८३.९९ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल ९० रुपयांच्या दिशेने वाटचाल करत आहे. आज दिल्लीत एक लीटर पेट्रोल ८६.९५ रुपये आहे. डिझेलचा भाव ७७.१३ रुपये आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ८९.३९ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८०.७१ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोल ८८.०१ रुपये झालं आहे. डिझेलचा भाव ८०.७१ रुपये झाला आहे. बंगळुरात पेट्रोल ८९.८५ रुपये झालं आहे तर डिझेल ८१.७६ रुपये आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -