घरमुंबईMGL Price : आज रात्रीपासून CNG एक रूपयांनी महागणार

MGL Price : आज रात्रीपासून CNG एक रूपयांनी महागणार

Subscribe

कोविड – १९ चा फटका हा सीएनजी पुरवठादार महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) लाही बसलेला आहे. त्यामुळेच आता कोरोनाच्या काळातला तोटा भरून काढण्यासाठी तसेच रूपयाचे डॉलरच्या तुलनेत झालेले अवमूल्यन यामुळे बसलेल्या गॅस दरवाढीचा फटका यामुळे एमजीएलने गॅसचा दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एमजीएलने आज, शुक्रवारी मध्यरात्रीपासून सीएनजीचा दर प्रत्येक किलोमागे १ रूपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सीएनजीसाठी आता ४८.९५ रूपये प्रति किलो रूपयांनी मुंबईत उपलब्ध होणार आहे. सीएनजीच्या दरात वाढ केलेली असली तरीही सीएनजीमुळे होणारी बचत ही पेट्रोलच्या तुलनेत ६० टक्के तर डिझेलच्या तुलनेत ३९ टक्के सीएनजी स्वस्त आहे.

गेल्या महिन्यातील अखेरीस म्हणजेच ३० जूनच्या मध्यरात्रीपासूनही महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) च्या सीएनजी आणि पीएनजी ग्राहकांसाठी गॅस दरवाढ लागू करण्यात आली होती. एमजीएलच्या आरसीएफ पाईपलाईनच्या नेटवर्कमधून मिळणाऱ्या गॅसच्या दरात झालेल्या वाढीमुळे हे वाढीव दर लागू केले होते. त्यामुळे सीएनजीचा दर हा किलोमागे ०.३२ रूपये इतका वाढले. तर पीएनजी गॅसचा दर हा ०.२३ रूपये इतका वाढले. सीएनजीचा नवा दर हा किलोमागे ५१.९९ रूपये झाला असून पीएनजीचा दर हा स्लॅब १ साठी ३१.७९ रूपये तर स्लॅब २ साठी ३७.३९ रूपये इतका वाढला. दरम्यान, पुन्हा एकदा सीएनजीचे दर वाढवण्यात आले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा –

पोटा-पाण्यासाठी रस्त्यावर काठी फिरवणाऱ्या आजीबाईंना सोनू सूदने दिली ‘ही’ ऑफर

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -