घरमुंबईएटीकेटी, रिपीटर विद्यार्थ्यांना प्रवेशाची दारे बंद

एटीकेटी, रिपीटर विद्यार्थ्यांना प्रवेशाची दारे बंद

Subscribe

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकारने फेरपरीक्षेत उतीर्ण झालेले विद्यार्थी व एटीकेटी लागलेल्या विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश देण्याची व्यवस्था केली. पण राज्य सरकारच्या निर्णयाला कॉलेजांकडून वाटाणाच्या अक्षता लावण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना मिळालेली कमी टक्केवारी आणि अभ्यासक्रम अर्धा पूर्ण झाल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास अनेक कॉलेज नकार देत आहेत. विद्यार्थ्यांना दुय्यम वागणूक दिली जात आहे. मात्र या संदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याने विद्यार्थी व पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये दहावी पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण (रिपीटर) तसेच दोन विषयामध्ये अनुतीर्ण झालेल्या म्हणजेच एटीकेटी लागलेल्या विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेशासाठी प्रवेश फेरी घेण्यात येत आहे. ज्या कॉलेजात रिक्त जागा आहेत. त्या कॉलेजात ऑनलाइन प्रवेश यंत्रणेमार्फत प्रवेश दिले जात आहेत. यंत्रणेकडून प्रवेश दिलेले असताना अनेक कॉलेजे या विद्यार्थ्यांना प्रवेश देत नाहीत. प्रवेशासाठी नको ती कारणे उपस्थित करुन त्यांचा वेळ घालवत आहेत. अशी तक्रार घेऊन अनेक विद्यार्थी शिक्षण उपसंचालक कार्यालयात येत आहेत. मात्र शिक्षण उपसंचालक कार्यालयात या विद्यार्थ्यांना योग्य उत्तर न देता या अधिकार्‍यांकडून त्या अधिकार्‍यांकडे चकरा मारायला लावले जात आहे. त्यामुळे ऑनलाइन पोर्टलमधून प्रवेश मिळूनही कॉलेज विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारत असतील तर कॉलेजावर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न शिक्षकांकडून विचारण्यात येत आहे.

- Advertisement -

प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ
ज्या विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळालेला नाही, ज्यांच्या अर्जामध्ये काही चुका झाल्याने, पासवर्ड विसरल्याने प्रवेश घेता आला नाही, अशा अनेक तक्रारी घेऊन विद्यार्थी शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये येत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी कार्यालयाकडून अकरावी प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. यासदंर्भातील निर्णय पुढील दोन दिवसांत घेण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -