घरमुंबईबिल भरण्यास नकार देणाऱ्या दोन हवालदारांचे निलंबन

बिल भरण्यास नकार देणाऱ्या दोन हवालदारांचे निलंबन

Subscribe

मद्याच्या नशेत गैरवर्तन करून हॉटेलचे बिल न भरणाऱ्या दोन हवालदारांना निलंबित करण्यात आले आहे. या दोघांनी मालाड पोलीस ठाण्यात शिवीगाळही केली.

फुकटची दारू पिऊन बारमध्ये धिंगाणा घालणाऱ्या दोन पोलीस हवालदारांचे निलंबन करण्यात आले. दिरू पिऊन पैसे न देता या हवालदारांनी बारमधील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. पोलीस कॉन्स्टेबल राजेश गिरी आणि विनायक पाटील अशी या दोघांची नावे आहेत. हे दोन्ही हवालदार गोरेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होते. मालाड येथील ‘लावण्यदीप’ या ऑर्केस्ट्रा बारमध्ये या दोघांनी धिंगाणा घातला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

कसा घडला प्रकार

मालाड परिसरात असलेल्या एका बारमध्ये राजेश आणि विनायक आपल्या मित्रासोबत दारू पिण्यासाठी गेले होते. येथे त्यांनी बराच वेळ बसून दारू आणि खाण्याचे पदार्थ मागवले होते. मध्यरात्री १ च्या सुमारास हे दोघे या ठिकाणाहून निघाले. त्यावेळी बार मालकाने यांच्याकडून दारू आणि जेवणाचे पैसे मागितले. त्यावेळी आपला पोलीसी खाक्या दाखवत यांनी पैसे देण्यास नकार दिला. बारमालकाने त्यांच्या कडे पैसे देण्याची विनंतीही केली मात्र हे दोघे पैसे देण्याच्या मनस्थितीत नव्हते. पोलीसांकडे पैसे मागतो असे सांगून त्यांनी बार मालकाशी हूज्जत घालण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यामुळे बारमालकाने या संदर्भात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केली.

- Advertisement -

पोलिसांनाही शिवीगाळ

बारमालकाच्या फोननंतर मालाड पोलीस ठाण्याचे अधिकारी शेख आणि सोनावणे हे घटनास्थळी पोहोचले. मात्र नशेत असल्याने या दोघांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. त्यामुळे मदत बोलावून या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना माडाल पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलीस ठाण्यातही या दोघांनी धिंगाणा घातला. यानंतर त्यांना अटक करून त्यांची वैद्यकिय तपासणी करण्यात आली. त्यांच्यावर सध्या निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -