घरCORONA UPDATEघाटकोपरमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या घटली, १२ दिवसांमध्ये केवळ ९ रुग्णांची वाढ!

घाटकोपरमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या घटली, १२ दिवसांमध्ये केवळ ९ रुग्णांची वाढ!

Subscribe

मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या आता बाराशेच्या घरात जाऊन पोहोचली आहे. परंतु बारा दिवसांपूर्वी तिसऱ्या क्रमांकावर असलेला घाटकोपर एन विभाग आता कोरोनाग्रस्तांच्या क्रमवारीत १७व्या स्थानावर पोहोचला आहे. तर चेंबूर, देवनार हा एम-पश्चिम विभाग या कोरोनाग्रस्तांच्या क्रमावारीत ११ व्या क्रमांकावर आला आहे. मात्र भायखळा, नागपाडा हा ई विभाग कोरोनाग्रस्तांच्या यादीत बारा दिवसांपासून दुसऱ्या क्रमांकावरच आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईत घाटकोपर येथे राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांच्या पॅटर्नचा अभ्यास करून त्यांची अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे.

मुंबईत आतापर्यंत सुमारे १२०० कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये वरळी, प्रभादेवी या जी-दक्षिण विभागात २४६ रुग्ण आढळून आले आहेत. मागील आठ दिवसांपासून या विभागातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असताना, प्रथमच काल या विभागातील रुग्णांची संख्या कमी झालेली आहे. मागील काही दिवसांपूर्वी या विभागात केवळ ४ रुग्णच वाढले आहे. त्यामुळे २४२ वरून येथील रुग्णांची संख्या २४६ वर पोहोचली आहे. तर भायखळा,नागपाडा या ई विभागातही १०४वरून रुग्णांची संख्या १११वर पोहोचली आहे. तर डि विभागात ९४ रुग्णांची संख्या झाली आहे.

- Advertisement -

बारा दिवसांपूर्वी घाटकोपर एन विभाग तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यावेळी या विभागात सुरुवातीला केवळ १४ रुग्ण होते. परंतु बारा दिवसांनंतर या विभागातील करोनाकोरोनाग्रस्तांची संख्या २५ एवढी झाली आहे. सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी यांनी करोना बाधित रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी योग्यप्रकारे उपाययोजना केल्या. एवढेच नव्हेतर प्रत्येक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतानाच संशयित रुग्णापासून ते कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण येईपर्यंत ते विभागाची रेकी करतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींचे सतत मिळणारे सहकार्य आणि विभागातील अधिकाऱ्यांची बांधलेली टीम तसेच याचा संसर्ग रोखण्यासाठी पोलिसांच्या मदतीने आखलेला कृती आराखडा यामुळे बारा दिवसांत केवळ ९ रुग्ण या विभागात वाढलेले आहे.

विशेष म्हणजे झोपडपट्टीतील पहिला पॉझिटिव्ह रुग्ण घाटकोपरमधील झोपडपट्टीत आढळून आला होता. त्यामुळे इमारतींसह झोपडपट्टीत कसा याचा प्रार्दुभाव रोखता येईल याचाच विचार करत राबवण्यात आलेल्या कृती आराखड्यामुळेच या विभागातील रुग्णांची संख्या कमी झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, भायखळा,नागपाडा या ई विभागात बारा दिवसांपूर्वी २० रुग्ण होते. ही संख्या वाढून आता १११वर पोहोचली आहे. त्यामुळे ज्या विभागांमध्ये रुग्ण संख्या कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, याची माहिती घेऊन त्या पॅटर्नचा वापर मुंबईतील इतर विभागांमध्ये होण्याची गरज आहे.

- Advertisement -

कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे डिटेल्स सरकारकडून जारी करण्यात आले आहेत. इच्छुकांनी त्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्याचं आवाहन केलं जात आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड-19

मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे. खात्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

Chief Minister’s Relief Fund-COVID 19

Savings Bank Account number 39239591720

State Bank of India,

Mumbai Main Branch,

Fort Mumbai 400023

Branch Code 00300

IFSC CODE- SBIN0000300

मराठीत-

मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19

बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720

स्टेट बँक ऑफ इंडिया,

मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023

शाखा कोड 00300

आयएफएससी कोड SBIN0000300

सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -