घरताज्या घडामोडीधक्कादायक! हॉस्पिटलमधून पळालेल्या कोरोना रुग्णाचा फुटपाथवरच मृत्यू

धक्कादायक! हॉस्पिटलमधून पळालेल्या कोरोना रुग्णाचा फुटपाथवरच मृत्यू

Subscribe

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातून पळून गेलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा फुटपाथवरच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातून पळून गेलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा रुग्ण रुग्णालयाच्या बाहेरील फुटपाथवर पडला होता. तेथील काही स्थानिक रहिवाशांनी हा व्हिडीओ तयार केल्यानंतर हा प्रकार उजेडात आला आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

नेमके काय घडले?

स्थानिकांनी काढलेल्या व्हिडिओमध्ये फुटपाथवर कोरोनाबाधित रुग्ण झोपलेला असल्याचे आढळून आले. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी याबाबत रुग्णालयाला फोन करून माहिती दिली. या रुग्णाला कुठून आला याबद्दल विचारण्याचा प्रयत्नही केला. पण, त्याची बोलण्याचीही स्थिती नव्हती. अखेर तीन तासानंतर या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर या रुग्णाला तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. हा रुग्ण रुग्णालयातून पळून गेला होता असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, स्थानिकांनी हा व्हिडीओ केल्यानंतर या रुग्णाचा पत्ता लागला. याआधीही शास्त्रीनगर रुग्णालयातून कोरोनाबाधित रुग्ण पळून जाण्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.


हेही वाचा – ठाण्यातील खड्डे बुजवण्यासाठी पोलिसांचा पुढाकार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -