घरCORONA UPDATECoronaVirus: मुंबईतील वरळी परिसरात कोरोनाचे ५५ रुग्ण

CoronaVirus: मुंबईतील वरळी परिसरात कोरोनाचे ५५ रुग्ण

Subscribe

मुंबईतील वरळी परिसरात कोरोनाचे आणखी ५५ रुग्ण आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबईतील वरळी परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहेत. या परिसरात आणखी ५५ रुग्ण आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईमध्ये काल १०६ कोरोना रुग्ण आढळले असून त्यातील एकट्या वरळीत ५५ रुग्ण असल्याने वरळीकरांसाठी हा चिंतेचा विषय बनला आहे. आता माहितीनुसार मुंबईमध्ये रुग्णांची संख्या ही ६९६ वर गेली आहे. आमदार आदित्य ठाकरे यांचा वरळी हा मतदारसंघ असून त्यांनीही कोरोनाबाधितांसाठी काही उपाययोजना केल्या आहेत. त्याबाबतची माहिती त्यांची ट्विटरच्या माध्यमातून दिली.

वरळीतील अनेक भाग सील 

जी/दक्षिण विभागात कोरोना रुग्णांची संख्या १३३ वर पोहोचली आहे. वरळीत झोपडपट्ट्या अधिक असल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्याची आरोग्य यंत्रणेसमोर मोठी आव्हानं आहेत. पोलीस आणि पालिकेने या परिसरातील अनेक भाग सील केले आहेत. या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. त्यासाठी सॅनिटायझेशन करण्यात येत आहे. औषधांची फवारणीही होत आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारीही घरोघरी जाऊन तपासण्या करत आहेत, अशी माहिती सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली.

- Advertisement -

एनएससीआय डोम येथे क्वारंटाइनची व्यवस्था 

वरळीतील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून येथील एनएससीआय डोम येथे कोव्हिड-19 रूग्ण क्वारंटाइनसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटरवरून दिली आहे. महापालिकेने वरळी कोळीवाडा, प्रभादेवी, जिजामाता नगर सील केले आहेत. यातच अनेकांना क्वारंटाइन केले जात असून या सर्वांची व्यवस्था एका ठिकाणी करण्यासाठी वरळी येथील एनएससीआय डोम येथे ही सुविधा देण्यात आली आहे. साधारण एक हजारपेक्षा जास्त लोकांसाठी येथे बेड तयार केले असून भविष्यात कोरोनाचे रुग्ण वाढले तर त्यासाठीही तजवीज करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

धक्कादायक! भारतात कोरोनाने घेतले १४९ बळी; २४ तासांत १७ जणांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -