घरमुंबईकोरोना लसीकरण; खासगी रुग्णालयात विलंब

कोरोना लसीकरण; खासगी रुग्णालयात विलंब

Subscribe

मुंबईत तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला आजपासून सुरुवात झाली. पालिकेच्या बीकेसी जंबो कोविड सेंटर, सेव्हन हिल्स, खासगी रुग्णालयात कोरोनावरील लसीकरणाला सकाळी ९ पासून सुरुवात होणार होती मात्र को- विन ऍपमधील तांत्रिक अडचणीमुळे दुपारी १२ नंतर लसीकरणाला सुरुवात झाल्याचे वृत्त आहे. आज २५ लाख ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. मात्र काही ठिकाणी तीन तास, तर काही ठिकाणी चार तासानंतर लसीकरणाला सुरुवात झाली.घाटकोपर ( प.) येथील हिंदू महासभा रुग्णालयात सकाळी ९ वाजल्यापासून ज्येष्ठ नागरिकांनी लस घेण्यासाठी काहीशी गर्दी केली होती. मात्र को विन ऍपमधील तांत्रिक बिघाडामुळे व अडचणीमुळे तब्बल साडेसहा तास विलंबाने लसीकरण प्रक्रिया सुरू झाली. परिणामी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी उशीर झाल्याने लस न घेता काढता पाय घेत घर गाठले.

घाटकोपर येथील रहिवासी महेंद्र दोशी (८५) हे पत्नी उषा दोशी (८२) यांच्यासोबत हिंदू महासभा रुग्णालयात लस घेण्यासाठी सकाळी ९ वाजता हजेरी लावली. मात्र कोव्हीन ऍपमधील तांत्रिक अडचणीमुळे दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास लसीकरणाला सुरुवात झाली. त्यामुळे येथे रांगेत ताटकळत बसलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी थेट निराश होऊन घर गाठले. तर उर्वरित ज्येष्ठ नागरिकांनी जिद्दीने तेथेच थांबून आणि त्रास सहन करीत अखेर लस घेतली आणि आनंद व्यक्त केला. महेंद्र दोशी यांनी, मी कोरोना सुरू झाल्यापासून घराबाहेर गेलो नव्हतो, मात्र आता लस घेण्यासाठी मी घराबाहेर पडलो. थोडा वेळ लागला मात्र लस घेतल्याने आता मला घराबाहेर पडता येणार आहे. सर्वांनी लस घ्यायला हवीय. असे आवाहन त्यांनी केले आहे. खासगी रुग्णालयात लसीकरणासाठी २५० रुपये शुल्क घेण्यात येते. ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणामुळे मोठा आधार मिळणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -