घरमुंबईमुंबईतच तयार होणार कोरोना लस ! हाफकिनमध्ये उभारणार १५४ कोटींचा प्रकल्प

मुंबईतच तयार होणार कोरोना लस ! हाफकिनमध्ये उभारणार १५४ कोटींचा प्रकल्प

Subscribe

हाफकिनमध्ये उभारणार १५४ कोटींचा प्रकल्प

हाफकिन बायो फार्मासिटीकल कॉर्पोरेशन आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत कोविड लसीचे उत्पादन करण्यात येणार असून त्यासाठी १५४ कोटी रुपये खर्चाचा नवीन प्रकल्प मुंबईत सुरू करण्यात येत आहे. राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पाश्वर्र्भूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी हाफकिनला भेट देऊन औषध निर्माण करण्याबरोबर या संस्थेने आता कोविड लस निर्मितीसाठी आपला सर्व अनुभव पणास लावावा, यासाठी आयसीएमआर तसेच भारत बायोटेकची मदत घ्यावी. या मदतीसाठी राज्य सरकार पुढाकार घेईल, पण आता थांबू नये, अशी सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.

‘हाफकिन बायो फार्मासिटीकल कॉर्पोरेशन लिमिटेड यांना मिशन कोविड सुरक्षेअंतर्गत लसीची टेक्नॉलॉजी हस्तांतरण करण्यासाठी आयसीएमआरच्या मार्गदर्शनाने परवानगी मिळाल्यास लस प्रत्यक्ष उत्पादित करता येईल किंवा फील- फिनिशबेसिसवर हाफकिनला काम करता येईल, यामधून १२६ लाख कोविड लसी हाफकिनमार्फत उत्पादित होऊ शकतात, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. ‘कोविडला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे आता देखील संसर्गाला रोखण्यासाठी अतिशय काटेकोर पावले उचलण्यात येत असून येत्या काही दिवसात महाराष्ट्रात कोविड लसीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. येणार्‍या काळात हाफकिन संस्थेचे स्वत:चे असे ‘जैव वैद्यकीय संशोधन केंद्र’ स्थापन करण्यासाठी केंद्र शासनाची मदत घ्यावी, असे मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले.

- Advertisement -

कोरोना लसीच्या लवकर उपलब्धतेसाठी हाफकिन महामंडळाच्या परळ आणि पिंपरी येथे उत्पादन सुविधा उपलब्ध असल्याने येथील उपलब्धता लक्षात घेऊन यादृष्टीने काम सुरू करायला हवे. हाफकिनच्या पोलिओ लस उत्पादन सुविधेची असलेली वार्षिक उत्पादन क्षमतेबरोबरच कोरोना लसींचा निर्मिती आणि पुरवठाही वाढविण्यात यावा. परळ येथील हाफकिन संस्थेत कालमर्यादेत प्रयोगशाळा उभारण्यासाठी उपलब्ध असणारी जमीन, लस तयार करण्यासाठी आवश्यक असणारा खर्च, तज्ञ मनुष्यबळाची तरतूद या सगळ्या बाबी तपासून घ्याव्यात. हाफकिनमार्फत एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत अंदाजे १२६ कोटी लस निर्माण करण्याची क्षमता आहे. सध्या भारत बायोटेकशिवाय इतर लस तयार करणार्‍या उत्पादकांबरोबरही प्राथमिक बोलणी करावी, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

हापकिनची लस निर्मिती पहिल्या टप्प्यात
भारत बायोटेक यांच्याकडील लस ठोक स्वरुपात घेण्यात येणार असून ती हाफकिन बायो फार्मासटीकल कॉर्पोरेशनमार्फत रिपॅकिंग व फिलिंग करून आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्यात येईल. सध्या या लसीचे उत्पादन भारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्यामार्फत संयुक्तपणे केले जाते. कोवॅक्सिन या नावाने ही लस सध्या बाजारात आणली आहे. हाफकिन बायो फार्मासटीकल कॉर्पोरेशनमार्फत कोविड लसीची गरज असेल तोपर्यंत हे उत्पादन सुरू ठेवण्यात येईल आणि त्यानंतर या प्रकल्पामधून श्वान दंशावरील लस विकसित करून या लसीचे उत्पादन घेण्यात येईल किंवा वेळीवेळी लागणार्‍या अन्य लसींच्या उत्पादनासाठी या प्रकल्पाचा उपयोग करण्यात येईल. भारत बायोटेककडून ठोक स्वरुपात कोविड लस पुरविण्यासंदर्भात केंद्र शासनाला सविस्तर प्रस्ताव तातडीने पाठविण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -