घरमुंबईशिक्षकांना प्रशिक्षण मराठी भाषेतच

शिक्षकांना प्रशिक्षण मराठी भाषेतच

Subscribe

वंदे गुजरातच्या वादावर शिक्षणमंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबई : राज्यातील शिक्षकांना पहिली ते आठवीच्या अभ्यासक्रम बदलांचे प्रशिक्षण वंदे गुजरात या चॅनेलच्या माध्यमातून देण्यावरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु झाला आहे. या वादावर अखेर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

गुजरात सरकारकडे स्वत:ची १६ शैक्षणिक चॅनेल आणि वाहिन्या सुरु असून, या माध्यमातून महाराष्ट्रातील शिक्षकांना विनामूल्य प्रशिक्षण देण्याची सुविधा गुजरात सरकारने दर्शविली, त्यानुसार गुजरात सरकारच्या वंदे गुजरात या शैक्षणिक चॅनेलच्या माध्यमातून शिक्षकांना विनाशुल्क प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकारांशी बोलताना जाहीर केले.

- Advertisement -

राज्यामध्ये २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून १ ली व ८ वीची पाठ्यपुस्तके पुनर्रचित करण्यात आली आहेत. या पाठ्यपुस्तकांमध्ये केलेल्या बदलांबाबत राज्यातील शिक्षकांना डिजीटलच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम शिक्षण विभागाने आयोजित केला आहे. त्यावरुन वाद सुरु झाला असून या वादाबाबात स्पष्टीकरण देताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी भूमिका स्पष्ट केली आहे.

राज्यातील शिक्षकांना पाठ्यपुस्तकांबाबत प्रशिक्षण देण्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री चॅनेलवर प्रक्षेपणासाठी सरकारला पैसे मोजावे लागले असते, परंतु गुजरात सरकारच्या स्वत:च्या १६ चॅनेलच्या माध्यमातून हे प्रक्षेपण विनाशुल्क DD Direct Free DTH यावर उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शविली, असे तावडे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -