Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी मुंबईसाठी पालिकेचा वेट अँण्ड वॉच, Covid-19 तिसर्‍या स्थराचे निर्बंध कायम

मुंबईसाठी पालिकेचा वेट अँण्ड वॉच, Covid-19 तिसर्‍या स्थराचे निर्बंध कायम

मुंबईकरांना दिलासा मिळण्यासाठी आणखीन काही दिवस तरी प्रतिक्षाच करावी लागणार

Related Story

- Advertisement -

मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट ५.२५ वरून ४.४० टक्के वर आला आहे. त्यामुळे मुंबई तिसऱ्या स्तरामधून दुसऱ्या स्तरात येणे आणि त्यामुळे मुंबईतील निर्बंधात आणखीन शिथिलता येण्याची मुंबईकरांना अपेक्षा होती; मात्र पालिका प्रशासनाने यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. परिणामी मुंबईकरांचा काहीसा हिरमोड झाला असून मुंबईकरांना दिलासा मिळण्यासाठी आणखीन काही दिवस तरी प्रतिक्षाच करावी लागणार आहे. पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी, निर्बंधांमध्ये आणखी शिथिलता दिल्यास कोरोनाचा प्रसार वाढू शकतो. यामुळे दहा ते पंधरा दिवस आम्ही वेट ऍण्ड वॉचच्या भूमिकेत आहोत. दुसऱ्या स्थरातील निर्बंध लागू करण्याबाबत महापालिकेने कोणताही निर्णय घेतलेला नाही. मुंबईत Covid-19 तिसर्‍या स्थराचे निर्बंध कायम असल्याचे सांगितले. ( Covid-19 3rd tier restrictions remain in mumbai – bmc)

- Advertisement -

 

राज्य सरकारने राज्यातील कोरोनाबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेऊन प्रत्येक जिल्हा कोणत्या स्तरात आहे, त्यासाठी कोणते निर्बंध लागू असतील आणि किती प्रमाणात शिथिलता असेल याबाबतचे निकष ठरवले आहेत. त्यानुसार ब्रेक द चैन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये ७ जूनपासून शिथिलता देण्यात आली आहे. मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट यापूर्वी ५.२५ होता म्हणून मुंबई तिसऱ्या स्तरात होती. मात्र आता मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट ४.४० टक्के  झाला आहे. मात्र कोरोनाच प्रसार अद्याप कमी झालेला  नसल्याने तिसऱ्या स्थरातील निर्बंध यापुढे आणखी काही दिवस लागू राहणार आहेत.

- Advertisement -

मुंबईत २ लाख ६९ हजर ५६९ चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी ११ हजार ८७८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईमध्ये सध्या १२ हजर ५९३ ऑक्सिजन बेड्सपैकी ३ हजार ४१६ बेड्सवर रुग्ण आहेत. तर ९ हजार १७७ बेड्स रिक्त आहेत. मुंबईमधील एकूण बेड्स पैकी २७.१२ टक्के बेड्सवर रुग्ण आहेत.


हेही वाचा – Corona Update : धारावीची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल; केवळ १६ सक्रिय रुग्ण

 

 

 

- Advertisement -