Monday, May 10, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Corona Update: मुंबईत आणखीन ४ ठिकाणी कोविड सेंटर उभारणार - महापौर

Corona Update: मुंबईत आणखीन ४ ठिकाणी कोविड सेंटर उभारणार – महापौर

Related Story

- Advertisement -

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याच दरम्यान बेड्सची कमरता भासत आहे. त्यामुळे आता रेल्वेचे २ हजार ८०० बेड्स ताब्या घेण्यासाठी मुंबई महापालिका प्रयत्न करत आहे. तसेच सध्याची रुग्णवाढ लक्षात घेऊन मुंबईत आणखीन ४ ठिकाणी कोविड सेंटर उभारणार असल्याची माहिती आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली. मुंबईत एकूण ५ हजार ३०० बेड्स आणि ८०० आयसीयू बेड्स असलेले सेंटर्स उभारण्यात येणार आहे. तसेच २ ते अडीच हजार बेड्स वरळीत उपलब्ध केले जाणार आहे. त्यामुळे सध्या आवडीच्या रुग्णालयाचा हट्ट धरू नका, असे आवाहन किशोर पेडणेकर यांनी मुंबईकरांना केले आहे.

महापौर आज पत्रकार परिषदेद्वारे मुंबईतील बेड्स आणि आयसीयू बेड्सचा आढावा दिला. यावेळी त्या म्हणाल्या की, ‘जिथं जागा उपलब्ध होईल, तिथं कोविड सेंटर उभारणार आहे. त्यामुळे आता मुंबईत आखणीन ४ ठिकाणी कोविड सेंटर उभारणार जाईल. कांजूरमार्गमध्ये एमएमआरडीएच्या जागेवर २ हजार बेडचं केंद्र उभारणार आहे. तसेच मालाडमध्ये रहेजा मैदानावर २ हजार बेडचं, सोमय्या मैदानावर १ हजार बेडचं आणि महालक्ष्मी परिसरात ३०० बेडचं कोविड सेंटर उभारणार आहेत. दोन ते तीन दिवसांमध्ये हे मुंबईकरांसाठी उपलब्ध होणार आहे.’

- Advertisement -

‘त्यामुळे आता खासगी रुग्णालयावरचा ताण वाढवण्याऐवजी प्रथम पालिकेच्या सेंटरला प्राधान्य द्यावं. त्यानंतर जर तुम्हाला खासगी बेड घ्यायचा असेल तर घेऊ शकता. रुग्णालयात भरती होण्यासाठी विलंब होत असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. सध्याच्या स्थितीत माणसांचा जीव वाचवणे महत्त्वाचे आहे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.


हेही वाचा – गुजरातच्या भाजप कार्यालयामध्ये रेमडेसिवीरचा मोठा साठा – नवाब मलिक


- Advertisement -

 

- Advertisement -