घरक्राइमLive Update: मुंबईत मागील २४ तासात १७०८ कोरोना रुग्णांची नोंद, ९४१ रुग्णांना...

Live Update: मुंबईत मागील २४ तासात १७०८ कोरोना रुग्णांची नोंद, ९४१ रुग्णांना डिस्चार्ज

Subscribe

राज्यात १५,६०२ नव्या कोरोना बाधितांची नोंद, ८८ जणांचा मृत्यू

राज्यात मागील २४ तासात १५,६०२ नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ७,४६७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २१,२५,२११ करोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.४९% एवढे झाले आहे.

- Advertisement -

मुंबईत मागील २४ तासात १७०८ कोरोना रुग्णांची नोंद, ९४१ रुग्णांना डिस्चार्ज

मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना संसर्ग वाढल्याने कोरोना रुग्णांचा आकडाही वाढू लागला आहे. मुंबईत मागील २४ तासात १७०८ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर २४ तासात ५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ९४१ रुग्णांनी मागील २४ तासात कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ३,१६,३२० कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचा दर ९२ टक्क्यांवर आहे. मुंबईत १३,२४७ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

- Advertisement -

कन्नड संघटनेविरोधात शिवसेना आक्रमक

महाराष्ट्र – कर्नाटक बस वाहतूक बंद, शिवसेनेची कन्नड संघटनांविरोधात निदर्शने


लॉकडाऊन करण्यास भाग पाडू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला इशारा

परिस्थिती अजूनही नियंत्रणात असून हॉटेल, उपाहारगृहांनी नियमांचे पालन करावे आणि कडक लॉकडाऊन करण्यास भाग पडू नये. हा शेवटचा इशारा आहे,’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.


गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त नितीन अलकनुरे एनआयए कार्यालयात दाखल

अलकनुरे हे अंबानी स्फोटके प्रकरणाचा वाझे यांच्या नंतर तपास अधिकारी म्हणून काम पहात होते. सचिन वाझे यांच्याकडून स्फोटके प्रकरणाचा तपास काढून घेतल्यानंतर गुन्हे शाखेचे एसीपी नितीन अलकनुरे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. सचिन वाझे यांची एनआयए कार्यालयात चौकशी सुरू असतानाच अलकनुरे हे देखील आल्याने स्फोटकांची स्कॉर्पिओ आढळून आल्यापासून नेमका तपास कसा सुरू झाला होता हे एनआयए जाणून घेण्याची शक्यता.


रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची सर्वसाधारण सभा आज मुंबई येथे पार पडली आणि त्यात ही निवड करण्यात आली.


सांस्कृतिक, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख घेणार कोरोनाची लस घेणार, दुपारी ४.३० वाजता जे.जे. रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेणार आहेत.


भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यावर खंडणीचा गुन्हा

वरळी येथे फ्लॅट बुक करण्यास भाग पाडून त्याचा ताबा न देणे, वाढीव रक्कम भरण्यास धमकावून फसवणूक करणे व खंडणी मागणीतल्याप्रकरणी भाजपाचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .त्यांचा मुलगा व इतरांवर पुण्यातील चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


रेखा जरे हत्या : मुख्य सूत्रधार बाळ बोठेला अटक

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्येप्रकरणी फरार असलेला आरोपी ज्येष्ठ पत्रकार बाळ बोठे यांना तीन महिन्यांनंतर अटक करण्यात आली आहे. पोलिसांना गुंगारा देणाऱ्या बाळ बोठे यांना हैदराबादमधून अटक करण्यात आली आहे.


सचिन वाझेंकडून सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज

मनसुख हिरण मृत्यू प्रकरणात अडलेले पोलीस आधिकारी सचिन वाझे यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. 19 मार्च रोजी त्यांच्या या अर्जावर सुनावणी होणार आहे.


देशात कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ!

कोरोनामुळे देशातील परिस्थिती दिवसागणिक गंभीर होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून तब्बल 24,882 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 140 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


महाराष्ट्र-कर्नाटक वाद आणखी चिघळला

महाराष्ट्र-कर्नाटक वाद पुन्हा चिघळला आहे. कर्नाटकमधील व्यक्तीकडून महाराष्ट्र एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात ही घटना घडली. त्यानंतर आता दोन्ही राज्याकडून एसटीची वाहतूक बंद करण्यात आली आहे.


नीट परीक्षेची तारीख जाहीर

मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट -2021′ (National Eligibility Cum Entrance Test) च्या परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. परीक्षा यंदा 1ऑगस्टला होणार आहे.


आगीत तेल ओतण्याचे धंदे बंद करा;- शिवसेनेचा हल्लाबोल

एमपीएसी परीक्षांवरुन विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार राम सातपुतेही सहभागी झाले होते. यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून विरोधकांवर निशाणा साधला आहे. “आगीत तेल ओतण्याचे हे धंदे त्यांनी आता बंद करावेत. पेट्रोल, डिझेलचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत, पण विरोधी पक्षासाठी ते स्वस्त झाले आहेत काय? असा सवाल करत भाजप नेत्यांवर टीका करण्यात आली आहे


कंगना आणि रंगोलीच्या अडचणींमध्ये वाढ

अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली चंडेल या दोघींविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कंगना आणि रंगोलीसोबतच एकूण चार जणांविरोधात विश्वासघात करणे, फसवणूक करणे आणि कॉपीराइट नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘बॉम्बे बेगम्स’ वादाच्या भोवऱ्यात

नेटफ्लिक्सची ‘बॉम्बे बेगम’ ही वेब सीरिज वादाच्या भोवऱयात अडकली आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने सीरिजमधील काही दृश्यांवर आक्षेप दर्शवला असून 24 तासांत सीरिजचे प्रदर्शन रोखण्याचे आणि स्पष्टीकरण देण्याचे आदेश नेटफ्लिक्सला दिले आहेत.


पहिल्या टी 20 मध्ये इंग्लंडकडून टीम इंडियाचा पराभव

पहिल्या टी 20 मध्ये इंग्लंडकडून टीम इंडियाचा पराभव झाला. अहमदाबाद नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी 20 सामन्यात इंग्लंडने भारताचा 8 विकेट्सने दणदणीत पराभव करुन मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.


सचिन वाझे यांच्यावर मनसुख हिरेन या ठाण्यातील व्यापाऱ्याची हत्या केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या हत्येप्रकरणी कधीही अटक होऊ शकते. त्यामुळे वाझेंनी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या जामीन अर्जावर शुक्रवारी म्हणजे १२ मार्च रोजी सुनावणी झाली. मात्र, सचिन वाझे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळावा अशी मागणी करणारा युक्तीवाद न्यायालयात करण्यात आला. त्यानुसार सचिन वाझे यांनी केलेल्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जावर १९ मार्च रोजी निर्णय घेण्यात येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -