घरमुंबईआदिवासी विकासासाठी डॅशबोर्ड

आदिवासी विकासासाठी डॅशबोर्ड

Subscribe

आदिवासी विकास योजनांच्य़ा माहितीसाठी डॅशबोर्ड तयार करा

आदिवासी विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या योजनांची/विविध उपक्रमांची माहिती व्हावी, तसेच त्याचा फायदा घेता यावा यासाठी या विभागाने डॅशबोर्ड तयार करावा, असे निर्देश आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी विभागाला दिले. आज मंत्रालयात आदिवासी विकास विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या डॅशबोर्डवर आदिवासी विकास विभागाची सर्व योजनांची माहिती तत्काळ मिळेल आणि याचा फायदा राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना होईल.

आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेताना या योजनांचा फायदा अधिकाधिक विद्यार्थ्यांना वेळेत होणे आवश्यक असून राज्य शासनामार्फत विदयार्थ्यांना देण्यात येणारी रक्कम वेळेत पोहोचेल याची खात्री करण्याबाबत निर्देश दिले. मानव विकास निर्देशांक ठरविण्यासाठी स्वयंयोजनेची व्याप्ती दहावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत वाढविण्याबाबत योजना तयार करणे, इतर विभागांनी आदिवासी विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व आदिवासी योजनांची माहिती वेगवेगळे ठेवणे आवश्यक आहे.

मी दर आठवड्याला एक आश्रम शाळा अथवा आदिवासी शाळेला भेट देतो. तर प्रत्येक अधिकाऱ्यांनी आश्रम शाळा, आदिवासी शाळेला भेट दिल्याशिवाय त्यांच्या अडचणी कळणार नाही. सचिवांपासून वरिष्ठ श्रेणीच्या अधिकाऱ्यांनी तेथे जाऊन तेथील परिस्थिती पहावी.

– डॉ. परिणय फुके, राज्यमंत्री, आदिवासी विकास

- Advertisement -

नामांकित शाळा व एकलव्य शाळा याबाबत अधिक प्रभावी धोरण आखून जास्तीत जास्त आदिवासी विद्यार्थ्यांना लाभ मिळेल या दृष्टीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश राज्यमंत्री डॉ. फुके यांनी दिले. यासोबत केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच इतर स्पर्धा परिक्षांमध्य़े अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना बार्टीच्या धर्तीवर चांगल्या दर्जाचे प्रशिक्षक नेमण्यात यावेत, असे डॉ. फुके यांनी सांगितले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -