घरताज्या घडामोडीIndore Airport: बंगळुरू दिल्ली फ्लाइटमध्ये ५० वर्षीय व्यक्तीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Indore Airport: बंगळुरू दिल्ली फ्लाइटमध्ये ५० वर्षीय व्यक्तीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Subscribe

आज एका विशेष विमानाने मनोज यांचा मृतदेह दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरी नेण्यात येणार

दिल्लीहून बंगळुरुला जाणाऱ्या एका खासगी एअरलाईन्सच्या विमानात एका ५० वर्षीय व्यक्तीची प्रकृती बिघडल्याने रात्री अचानक विमान इंदौरच्या अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरावे लागले. विमान लँड होताच संबंधित व्यक्तीला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयात येताच डॉक्टरांनी त्याल मृत घोषित केले. विमानतळाचे प्रमुख संचालक प्रमोद शर्मा यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, विस्तार एअरलाइन्सच्या यूके – ८१८ विमानात मनोज कुमार अग्रवाल प्रवास करत होते. विमानात बसल्यानंतर काही वेळातच त्याना श्वास घेण्यात त्रास होऊ लागला आणि काही वेळातच ते बेशुद्ध झाले. त्यानंतर विमानात एकच खळबळ उडाली आणि  बंगळुरू दिल्ली उड्डाण भरलेले विमान इंदौरच्या अहिल्या बाई होळकर विमानतळावर गुरुवारी ९:३० वाजताच्या सुमारास उतरवण्यात आले. त्यानंतर बेशुद्ध झालेल्या शर्मा यांना बांठिया या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

बांठिया रुग्णालयाचे संचालक डॉ. सुनील बांठिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज कुमार अग्रवाल यांना विमानात असतानाच ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्याचदरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. मनोज कुमार अग्रवाल याचे पोस्टमर्टम करुन मृतदेह यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्वरित याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली. मनोज यांच्या मृत्यूची माहिती मिळताचे त्यांचे कुटुंबिय इंदौर विमानतळावर दाखल झाले. आज एका विशेष विमानाने मनोज यांचा मृतदेह दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरी नेण्यात येणार आहे.

मृत मनोज कुमार अग्रवाल हे दिल्ली येथील राहणारे होते. दिल्लीच्या आशीष मार्केट टिळक बाजारात त्यांची एक पार्टनरशिप  फर्म होती. दिल्लीत ते स्वत:चा बिझेनेस करत होते. बिझनेसच्या कामानिमित्त ते बंगळूरुला गेले होते. तिथून परत येताना त्याना विमानातच ह्रदयविकाराचा इटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

हेही वाचा – OLA Cars १० हजार नव्या कामगारांना करणार भरती, १२ महिन्यात २ बिलियन डॉलर कमाईचे लक्ष्य

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -