Cruise Drugs Case: ड्रग्ज प्रकरणी नायजेरियन नागरिकाला अंधेरीतून अटक

Cruise Drugs Case ncb arrested 17 people including a Nigerian

मुंबईत शनिवारी रात्री २ ऑक्टोबरला एका क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने धाड टाकली. याप्रकरणात बॉलिवूडचा बादशाह किंग खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर याप्रकरणात चार, चार जणांना एनसीबीने अटक केली होती. एनसीबीने याप्रकरणी १६ आरोपींना अटक केलं होत. मात्र आज याप्रकरणातील १७व्या आरोपीला एनसीबीकडून अटक करण्यात आहे. हा व्यक्ती नायजेरियन असून त्याला अंधेरीतून अटक करून त्याच्याकडून ड्रग्ज जप्त केले आहे.

क्रूझ ड्रग्ज प्रकरणासंबंधितीची अजूनही एनसीबी ठिकठिकाणी छापेमारी करून ड्रग्ज जप्त करत आहे. आज अंधेरीतून एका नायजेरियन व्यक्तीला एनसीबीने अटक केली आहे. चिनेदु इगवे असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून Ecstasy ड्रग्जच्या ४० गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. हे एक प्रकारचे पार्टी ड्रग्ज आहे असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान आज क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाची कोर्टात सुनावणी पार पडली. याप्रकरणातील आरोपी आर्यन खानसह आठ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. फक्त आजची रात्री आर्यनसह इतर आरोपींना एनसीबी कोठडीत राहावे लागणार आहे. उद्या आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा आणि इतर आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्या आर्यनला जामीन मिळतो की नाही याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.


हेही वाचा – Cruise Drugs Case: आर्यनसह आठ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, मात्र आजची रात्र NCB कोठडीत