घरमुंबईसायबर युगातील लखोबा लोखंडे

सायबर युगातील लखोबा लोखंडे

Subscribe

सरकारी कर्मचारी असून सध्या ट्राय या शासकीय संस्थेत काम करीत असल्याचे सांगित महिलांना ५० लाखांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना कांदिवलीमध्ये घडलयाचे उघडकीस आले आहे.

सरकारी अधिकारी आहे. ट्रायमध्ये काम करतो, अशी खोटी माहिती या सायबर युगातील लखोबा लोखंडेने विवाह नोंदणी वेबसाईटवर दिली. त्यामुळे काही महिला त्याच्याकडे आकर्षित झाल्या. अशा तब्बल २५ महिलांना या लखोबाने ५० कोटी रुपयांना गंडा घातला. त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

सरकारी कर्मचारी असलेल्याचा दावा

या लखोबा लोखंडेकडून फसवली गेलेली तक्रारदार ३५ वर्षांची तक्रारदार महिला कांदिवलीतील चारकोप परिसरात रहाते. विवाहासाठी तिने जीवनसाथी डॉट कॉमवर तिचे प्रोफाईल दिले होते. जानेवारी महिन्यात तिला कृष्णा देवकाते याच्याकडून रिक्वेस्ट आली होती. त्याच्या प्रोफाईलमध्ये त्याने तो सरकारी कर्मचारी असून सध्या ट्राय या शासकीय संस्थेत काम करीत असल्याचे सांगितले. त्याची प्रोफाईल आवडल्यानंतर तिने त्याचे प्रप्रोजल स्विकारले. त्यानंतर ते दोघेही एकमेकांशी मोबाईल आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्कात होते. याच दरम्यान त्यांची भेटही झाली होती. प्रत्येक भेटीत त्याने तिच्याशी जवळीक साधून तिचा विनयभंग केला होता. आपली वैयक्तिक अडचणी सांगून तिच्या क्रेडिट कार्डवरुन सुमारे ८५ हजार रुपये घेतले होते. काही दिवसांपूर्वीच त्याने तिच्याशी असलेले संबंध तोडून टाकले होते. त्याच्याकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने चारकोप पोलिसांत तक्रार केली होती.

- Advertisement -

याप्रकरणी गुन्हा नोंद होताच त्याचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी सुरु केला होता. प्राथमिक तपासात कृष्णाने स्वत:चे नाव, विविध विवाह नोंदणी संकेतस्थळावर दिलेली माहिती बोगस असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या पथकाने महिलेची पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंतचा कालावधीचा आणि घडलेल्या घटनांचा बारकाईने अभ्यास केला होता. हा लखोबा लोखंडे कल्याणमध्ये रहात असल्याचे आढळतो, त्याला येथून अटक केली. तपासात त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याने विविध विवाह नोंदणी वेबसाईटवर त्याची बोगस प्रोफाईल दिली होती.

पूर्वी अटक झाली होती

कृष्णाने २५ हून अधिक तरुणींसह महिलांशी संपर्क साधला होता. आपण सरकारी नोकरीत असल्याचे सांगून त्यांच्याकडून त्याने ५० लाख रुपये उकळले होते. काही दिवसांपूर्वी त्याला नालासोपारा पोलिसांनी अशाच एका फसवणुकीच्या गुन्ह्यांत अटक केली होती.

- Advertisement -

बीपीओत काम करत होता

कृष्णा सध्या जामिनावर होता. त्याच्याविरुद्ध बीकेसी, चारकोप, नवी मुंबईतील कोपरखैरणे, पुणे येथील हडपसर पोलीस ठाण्यात अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. कृष्णा हा सध्या बीपीओमध्ये कामाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -