घरठाणेDahihandi festival : मुंबई महापालिका रुग्णालांची तयारी; 125 खाटा अन् वैद्यकीय उपचारांची...

Dahihandi festival : मुंबई महापालिका रुग्णालांची तयारी; 125 खाटा अन् वैद्यकीय उपचारांची व्यवस्था

Subscribe

Dahihandi festival : मुंबईत दरवर्षी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या दहीहंडी उत्सवात लाखो रुपयांची उलाढाल होते. दहीहंडी उत्सवासाठी हजारोंच्या संख्येने गोविंदा रस्त्यावर उतरतात. मात्र दहीहंडी उत्सव साजरा करताना शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्यास व काही प्रमाणात चुका झाल्यास गोविंदा उंच थरावरून खाली कोसळतात. त्यामध्ये काही गोविंदा विशेषतः लहान गोविंदा जखमी होतात. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी मुंबई महापालिकेने तीन प्रमुख रुग्णालयात आणि 16 उपनगरीय रुग्णालयात 125 खाटांची आणि वैद्यकीय उपचाराची व्यवस्था केली आहे. (Dahihandi festival Preparation of Mumbai Municipal patients Arrangement of 125 beds and medical treatment)

मुंबईत गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी यांसारखे सण, उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरे करण्यात येतात. गणेशोत्सवात तर सर्वधर्मीय लोक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. तद्वतच दहीहंडी उत्सवही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर, चौकात, गल्लीबोळात साजरा करण्यात येतो. दहीहंडी उत्सव बघण्यासाठी हजारोंच्या गर्दी होते. रस्त्यावर ट्रक, टेम्पो आदी मोठ्या वाहनांमधून गोविंदा दाटीवाटीने बसून, उभे राहून दहीहंडी फोडायला इच्छित स्थळी जातात.

- Advertisement -

हेही वाचा – निजामकालीन नोंदी असणाऱ्यांना कुणबी दाखले देणार; सरकारकडून 5 सदस्यीय समिती स्थापन

दादर, घाटकोपर, गिरगाव, माझगाव, भांडुप, मुलुंड, कांदिवली, बोरिवली आदी ठिकाणी दहिहंडी उत्सवाला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र दहिहंडी फोडताना गोविंदांचा अचानकपणे हात, पाय सटकतो, शरीराचा तोल जातो त्यातच गोविंदांचा थरच्या थर कोसळतात. त्यामध्ये त्या गोविंदांना हाताला, पायाला, कंबरेला , डोक्याला कमी-अधिक प्रमाणात मार लागतो व ते जखमी होतात. कधी कधी त्यांचे गंभीर जखमी होणे त्यांच्या जीवावर बेतते. त्यामुळे ही सर्व परिस्थिती लक्षात घेता मुंबई महापालिकेने आपल्या रुग्णालयांमध्ये आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच महापालिकेची सर्व प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये आणि आरोग्य यंत्रणेला सतर्क व सुसज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

महापालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयात 10, परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (के. ई. एम.) रुग्णालयात 7 रूग्णशय्या आणि मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात 4 रूग्णशय्या आणि विशेष उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच 16 उपनगरीय रूग्णालयातही 105 रूग्णशय्या सज्ज ठेवण्यात आले आहेत. या रुग्णालयांमध्ये प्रत्येकी 5 ते 10 खाटांची व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा – गुवाहाटीला गेलो…बदनाम झालो, पण…; बच्चू कडूंनी ठाकरेंचा उल्लेख करत केला मोठा खुलासा

या व्यवस्थेअंतर्गत निर्धारित पद्धतीनुसार किरकोळ जखमी झालेल्या गोविंदांवर प्रथमोपचार करुन त्यांना घरी सोडण्यात येते. तर, गंभीर जखमी आणि दीर्घकाल उपचारांची आवश्यकता असलेल्या गोविंदांसाठीही उपचार सुविधा देण्यात येणार आहे. याकरिता महापालिकेने 3 पाळ्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या रूग्णालयांमध्ये सर्व औषधे, इंजेक्शन आणि सर्जीकल मटेरिअल, पीओपी तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, एक्स-रे व इतर मशीनही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. सर्व रूग्णालय कर्मचारी आणि डॉक्टरांनी या काळात दक्ष रहावे, अशा सूचनाही महापालिकेच्या सर्व रुग्णालयांना व आरोग्य यंत्रणेला प्रशासनामार्फत करण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -